घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र१० वर्षाचे स्वप्न पूर्ण करत उभारला शिवरायांची तब्बल ६१ फुट उंच पुतळा

१० वर्षाचे स्वप्न पूर्ण करत उभारला शिवरायांची तब्बल ६१ फुट उंच पुतळा

Subscribe

नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अशोकस्तंभ चौकात हायमास्टपेक्षाही उंच अर्थात तब्बल ६१ फूट उंच शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. २२ फुट रूंद असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, याची भव्यता प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवरील एच. पी. ब्रदर्स आर्ट्सचे हितेश व हेमंत पाटोळे यांनी ही मूर्ती तयार केली आहे. मूर्ती बनवण्यासाठी एफआरपी फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. तसेच, आतील साचा स्टीलपासून बनवण्यात आला आहे. पुतळा साकारण्यासाठी तब्बल चार टन एफआरपी फायबर तर, चार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे १० वर्षांपासून अशी भव्यदिव्य मूर्ती साकारण्याचे स्वप्न होते. ते आता प्रत्यक्षात आले आहे. यंदाच्या १९ फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीच्या दिवशी नाशिककरांसाठी पुतळा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. ट्रेलरमधून अशोकस्तंभ येथे हा पुतळा आणला असून, ३ क्रेनच्या माध्यमातून पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. आतापासूनच ही भव्य मूर्ती शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

- Advertisement -
मूर्ती घडवताना ओढवले संकट

ही मूर्ती घडवत असताना शेवटचे काही काम बाकी असतानाच कार्यशाळेत शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामुळे स्टुडिओतील सामुग्रीचे नुकसान झाले. त्यानंतर मूर्तीकारांच्या हाती अवघा 19 दिवसांचा कालावधी हाती राहिला. एवढ्या कमी वेळात त्या मूर्तीकारांनी नव्याने मूर्ती तयार केली. महाराजांच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -