SBI ने लॉंच केली धांसू FD स्कीम, ४०० दिवसांसाठी मिळेल ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज, ‘या’ तारखेपर्यंत संधी

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. बँकेने मर्यादित कालावधीत SBI अमृत कलश योजना सुरू केली आहे.

SBI-FD

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. बँकेने मर्यादित कालावधीत SBI अमृत कलश योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याज दिले जात आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अधिक व्याज म्हणजेच ७.६० टक्के परतावा मिळत आहे. त्याचबरोबर स्टेट बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या योजनेवर १ टक्के अतिरिक्त व्याजदर मिळत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत अनेक बँकांनी त्यांच्या एफडी दरांमध्ये (एसबीआय एफडी योजना) वाढ केली आहे. अनेक स्मॉल फायनान्स बँका त्यांच्या ग्राहकांना FD योजनांवर ९ टक्क्यांपर्यंत व्याज देऊ करत आहेत. अशा स्थितीत स्टेट बँकेनेही व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या अमृत कलश योजनेबद्दल जाणून घेऊया.

SBI च्या अमृत कलश योजनेचा एकूण कार्यकाळ 400 दिवसांचा आहे. या योजनेत, कोणतीही व्यक्ती 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत पैसे जमा करू शकते. या योजनेत सर्वसामान्यांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 टक्के अधिक व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन SBI अमृत कलश खाते उघडू शकता. याशिवाय, तुम्ही SBI Yono च्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करू शकता.

एसबीआय अमृत कलश योजना अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना त्यांचे पैसे १ ते २ वर्षांच्या कालावधीसाठी कुठेतरी गुंतवायचे आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही यामध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळत आहे. या एफडी योजनेत तुम्ही १ लाख रुपये गुंतवल्यास ज्येष्ठ नागरिकांना ८,६०० रुपये आणि सामान्य ग्राहकांना ८,०१७ रुपये व्याज म्हणून मिळतील.

SBI ने FD-RD योजनेवरील व्याजदरात वाढ केली
स्टेट बँक ऑफ इंडिया देखील बुधवारी आपल्या FD आणि RD योजनेचे व्याजदर वाढवत आहे. यानंतर, बँक ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ३ % ते ६.५० % पर्यंत सामान्य नागरिकांना आणि ३.५० % ते ७.२५ % पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर देत आहे. आरडी योजनेमध्ये, १२ महिने ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ६.८० टक्के ते ६.५ टक्के व्याजदर दिला जात आहे.