घरमहाराष्ट्रबारामतीचा पोपट नंतर 'गंगाधर ही शक्तीमान है'; राज ठाकरे - शरद पवार...

बारामतीचा पोपट नंतर ‘गंगाधर ही शक्तीमान है’; राज ठाकरे – शरद पवार भेटीवर भाजपची टीका

Subscribe

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी राज ठाकरे यांनी नेहमीच्या शैळीत भाजपवर तोफ डागली. त्यानंतर रात्री अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याचा योगायोग जुळून आला. या योगायोगाची भाजपने मात्र चांगलीच खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांना भाजपने बारामतीचा पोपट असे विशेषण लावले होते. आता त्यांनी “कर्ता आणि करविता एकत्र येणे स्वाभाविकच असून “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे”, ट्विट केले आहे.

- Advertisement -

सोमवारी (दि. १५ एप्रिल) सोलापूर येथील सभा संपवून राज ठाकरे बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पोहोचले. तर उस्मानाबाद इथली सभा संपवून शरद पवार देखील हॉटेल बालाजी सरोवर इथे पोहोचले. शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात आज सभा घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी बालाजी सरोवरमध्येच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचा – सोलापूरात राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहाल टीका

- Advertisement -

राज ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे वृत्त झळकल्यानंतर भाजप महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून दोन्ही नेत्यांवर खोचक शब्दात टीका करण्यात आली आहे. शक्तिमान या मालिकेपासून प्रसिद्ध झालेले ‘गंगाधर ही शक्तिमान है’ हे वाक्य भाजपने ट्विट केले आहे.

हॉटेल बालाजी सरोवर पुढाऱ्यांचा मीटिंग पॉईंट

बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी याच बालाजी सरोवर हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर नाश्ता करत असताना शिंदे देखील तिथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशेजारी बसून त्यांची विचारपूस केली होती. या भेटीचे फोटो-व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल झाल्यामुळे सोलापूरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -