घरमुंबईट्रेनवर सेल्फीचा मोह अंगाशी; ओव्हरहेड वायरचा बसला शॉक

ट्रेनवर सेल्फीचा मोह अंगाशी; ओव्हरहेड वायरचा बसला शॉक

Subscribe

सेल्फी काढण्यासाठी ट्रेनच्या छतावर चढलेल्या १३ वर्षाच्या मुलगा ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने शॉक लागून गंभररित्या जखमी झाला आहे.

जखमी झालेल्या १३ वर्षाच्या मुलावर चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. ही घटना रविवारी दुपारी जोगेश्वरी रेल्वे यार्ड येथे घडली. खुशाल बेडा (१३) असे या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव तो मालाड मालवणी येथे वडिलांसोबत राहण्यास आहे. इयत्ता ९ वीत शिकणारा खुशाल हा शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे रविवारी मित्रांसोबत राममंदिर आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असणाऱ्या जोगेश्वरी रेल्वे यार्डात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. यार्डात उभ्या असलेल्या ट्रेनच्या वर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह खुशाल आणि त्याच्या मित्राना झाला.

अशी घडली दुर्घटना

प्रथम खुशाल हा ट्रेनच्या छतावर चढून सेल्फी काढत असताना तो ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन त्याला शॉक लागला. ओव्हरहेड वायरच्या शॉक लागल्याने खुशालचे पूर्ण शरीर काळेठिक्कर पडले. हा प्रकार बघून घाबरलेल्या त्याच्या इतर मित्रांनी खुशालच्या वडिलांना तसेच परिसरातील इतरांना मदतीसाठी बोलावले. दरम्यान यार्डातील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी खुशालला ट्रेनच्या छतावरून खाली आणून त्याला उपचारासाठी प्रथम सिद्धार्थ रुग्नालयता दाखल कऱण्यात आला होते. मात्र गंभीरीरत्या होरपल्यामुळे त्याला तेथून परळ केईएम रुग्णालयात दाखल केले, तेथून त्याला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्नालयता दाखल कऱण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -