घरमहाराष्ट्रआम्हाला टॅक्सी मिळवून द्या; आमदारांची विधानसभेत मागणी

आम्हाला टॅक्सी मिळवून द्या; आमदारांची विधानसभेत मागणी

Subscribe

आम्हाला टॅक्सी मिळवून द्या, अशी मागणी आमदारांनी आज विधानसभेत केली आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार मुंबईत येतात. बहुतेक आमदार हे रेल्वेने मुंबईत येतात. आता आमदार म्हटलं की आपापल्या मतदारसंघात त्यांची चलती असतेच, तिथे त्यांच्या शब्दाला वजन असते. मात्र मुंबईत उतरताच त्यांना कुणीही ओळखत नाही. साधा टॅक्सीवाला देखील त्यांचे भाडे नाकारतो. सामान्य माणसाचे एक ठिक आहे, तो काही दाद मागायला कुणाकडे जात नाही. पण आमदारांनी मात्र आपल्यावरील या अन्यायाला विधानसभेत आज वाचा फोडली आहे.

भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सीएसएमटी स्टेशनवर टॅक्सी मिळावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘अनेक आमदार आपापल्या जिल्ह्यातून रात्री ट्रेनमध्ये बसतात आणि सकाळी मुंबईत उतरतात. आता सोमवारी पुन्हा एकदा आमदार आपल्या गावातून येतील. मात्र, सीएसएमटी स्टेशनवरून आमदार निवासात जायला टॅक्सीच मिळत नाही. अर्धाअर्धा तास तिथे थांबावे लागते. यासाठी सीएसएमटी स्टेशनवर सकाळी ६ ते ८ पर्यंत पोलीस ट्राफिक कंट्रोलर नियुक्त करावा. जो रांगेत उभे राहून सर्वांना टॅक्सी उपलब्ध करून देऊ शकतो‘, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

मंत्र्यांची गाडी येते, ते निघून जातात

गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यावेळी सभागृहात उपस्थित असताना देशमुख म्हणाले की, ‘तुम्ही देखील पुर्वी आमच्यासोबतच रांगेत उभे राहत होतात. आता तुम्ही मंत्री झाल्यापासून तुमची गाडी येते आणि तुम्ही निघून जातात. पण आमच्यासारख्या आमदारांचाही विचार करा आणि आम्हाला तेवढी टॅक्सी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा‘, अशी मागणी त्यांनी केली.


हेही वाचा – विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका


 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -