घरमुंबईविधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. पावसाळी अधिवेशन सुरू असून आज, सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनी कशा प्रकारे कामं केली, उपक्रमशीलता हा त्यांच्या स्वभावाचा विशेष आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता हे दोघेही विदर्भातील असल्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावर वडेट्टीवार यांना संधी देतो आणि निवडणूक संपल्यावर त्यांना बाजूला करून दुसऱ्याला संधी दिली जाते. मात्र मला विश्वास आहे की आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पुढेही वडेट्टीवारांना संधी द्यावी’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. ‘निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या कुणाला तरी संधी द्यायची असं करू नका’, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच ‘तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करू नका’, असं विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना, ‘फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत ते आठवा’, असे म्हटले.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आणण्यात वडेट्टीवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. २०१४ पासून काँग्रेस पक्षाचे उपनेते म्हणूनही विजय वडेट्टीवार काम करत होते. विविध समित्यांवर आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं कार्य मोठं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा –
विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हेंचा अर्ज दाखल
वर्षा बंगल्यांच्या पाण्याचे देयक थकल्यासंदर्भात ‘ही’ वस्तुस्थिती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -