घरताज्या घडामोडीLive Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना


मुसळधार पावसामुळे यवतमाळ आणि वर्ध्यात गंभीर पूरस्थिती

- Advertisement -

शिवसेना खासदारांची बैठक संपली, १२ खासदार घेणार पत्रकार परिषद


सरकारची परिस्थिती आयसीयुतील रुग्णासारखी, एकनाथ खडसेंची टीका

- Advertisement -

शिंदे गटाकडून कार्यकारिणी जाहीर, एकनाथ शिंदे मुख्य नेते तर दीपक केसरकर प्रवक्ता

रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड

पक्षप्रमुख पदाला हात लावला नाही

उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि शिवाजीराव आढळराव पाटील


गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना


काँग्रेस खासदार सोनिया गांधी, शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.


लोकसभेचे कामकाज तहकूब


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर


मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला, शिवसेना नेतेपदाच्या राजीनामानंतर रामदास कदमांचे पत्र


शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा


मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत


इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुलावरून कोसळली, या बसमध्ये ५० ते ५५  प्रवासी प्रवास करत होते, अपघात ग्रस्त बस ही एसटी महामंडळाची होती, मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु


खासदार  संजय राऊत यांनी घेतली शपथ


माजी पंतप्रधान मनमोहन सिंह संसदेत दाखल


राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात


विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्याच्या भेटीला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही केले मतदान

आत्तापर्यंत भाजपच्या 64 आमदारांनी केला मतदान


गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क


राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु


शिंदे गटातील आमदार विधान भवनात दाखल


स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान – संजय राऊत


सर्वांच्या प्रयत्नाने संसद उत्तम निर्णय घेऊ शकेल – मोदी

देशाचा विकास जलद गतीने होतोय – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र दिसत नाही- आशिष शेलार

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित – आशिष शेलार


आज राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. तर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार आहे.


संसदेच आज पावसाळी अधिवेशन, अग्निपथसह विविध मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला घेण्याची तयारी

12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार असून यात एकूण 18 बैठका आणि 24 विधेयकं मांडली जाणार आहेत.


पंढरपुरातील श्री विठ्ठल आश्रममधील 40 जणांना अन्नातून विषबाधा झाल्य़ाची घटना समोर आली आहे. या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -