घरमहाराष्ट्रपुणे...आणि गिरीष बापट झाले भावनिक; कसबा निवडणूक आपणच जिंकणार

…आणि गिरीष बापट झाले भावनिक; कसबा निवडणूक आपणच जिंकणार

Subscribe

बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बापट यांना भेटायला गेले होते. गुरुवारी बापट हे कसब पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले. व्हिल चेअरवर बापट हे आले होते. त्यांना ऑक्सिजन लावले होते. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना बोलायलाही जमतं नव्हते. त्यामुळे खासदार बापट यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संदेश लिहून आणला होता.

पुणेः ही चुरशीची निवडणूक नाही. ही निडणूक आपण जिंकणार. चांगल्या मतांनी जिंकणार. कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पडावी. मुक्ता शिवाय या सभागृहात सांगूही शकत नाही, असे सांगताना भाजप खासदार गिरीष बापट हे भावनिक झाले होते. बापट हे आजारी आहेत. तरीही ते कसबा निवडणुकीच्या प्रचारासाठी खास आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा उपस्थित महिला कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बापट यांना भेटायला गेले होते. गुरुवारी बापट हे कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले. व्हिल चेअरवर बापट हे आले होते. त्यांना ऑक्सिजन लावले होते. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना बोलायलाही जमतं नव्हते. त्यामुळे थोडा वेळच त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संदेश लिहून आणला होता. गिरीष बापट यांचा हा संदेश भाजपचे उमदेवार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना वाचून दाखवला. सर्वांनी खूप काम करा, उमेदवार नक्की निवडून येईल, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. तुम्हा सगळ्यांना बऱ्याच दिवसांनी भेटून आनंद वाटला. सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या आजारपणामुळे मला सगळ्यांशी बोलणं शक्य होत नाही आहे. मात्र तुमच्याशी वेळोवेळी संपर्क करेन, अशी भावनिक साद बापट यांनी कार्यकर्त्यांना घातली.

- Advertisement -

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्या वर्षी निधन झाले. निवडणूक आयोगाने त्यांच्या जागी पोट निवडणूक जाहिर केली. ही पोट निवडणूक जाहिर झाल्यानंतर सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीने तयारी सुरु केली. ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह भाजपमधील नेत्यांनी धरला आहे. मात्र त्या आग्रहाला धुडकावत महाविकास आघडीने या पोट निवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यासोबतच भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासन यांची उमेदवारी जाहिर केली. ब्राम्हण उमेदवार न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज आहे. ही नाराजी दूर करण्यासाठीच भाजपने बापट यांना प्रचारासाठी आणले होते, अशी चर्चा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -