घरAssembly Battle 2022महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती राहील, संजय राऊतांचे वक्तव्य

महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती राहील, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

मंत्री आदित्य ठाकरे उद्या गोव्या दौऱ्यावर येणार असून ते शिवसेनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील.

सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यात गोव्यासह अनेक बड्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वचं पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचार, दौरे, गाठीभेटी घेतल्या जात आहे. यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री नवाब मलिक गोव्या दौऱ्यावर जाणार आहे. गोव्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रचारसभा होणार आहे. दरम्यान गोव्या निवडणुकांवरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. “निवडणुकीसाठी आमची तयारी काय आहे हे विरोधक सांगू शकतील असं म्हणत विरोधकांकडून दबावाचे राजकारण सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला तडा जाणार नाही” असा टोला लगावला आहे. तसेच “या सरकारचे स्टेअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहिल,” असे विधानही त्यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, “हीच भाजपाची कळ आहे, पोटात कळ येते ना ही ती कळ आहे, आणि कळ वेगवेगळ्या प्रकारची असते. भाजपाला कळ यामुळेच येते की प्रयत्नांची पराकाष्टा करून दाब दबावाचे राजकारण करून, धमक्या दहशतीचे राजकारण करून सुद्धा महाविकास आघाडीचा तडा जात नाही आणि तो तडा कधीच जाणार नाही. या सरकारचे स्टेअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहिल,” असं विधान त्यांनी केले आहे.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र कधीही झुकणार नाही, हे प्रयत्न करतायत महाराष्ट्राला झुकवण्याचा पण झुकणार नाही, माझी संपत्ती असेल तर त्यांनी घेऊन टाकावी, मी मराठी माणूस आहे महाराष्ट्रात माझी संपत्ती असायला हवी होती पण ती नाही आहे, मराठी माणसाच्या हातात चार पैसे खेळू नये मराठी माणूस कंगाल आणि भिकारीचं राहावा यासाठी हे षठयंत्र सुरु आहे. याचे उत्तर मुंबई महापालिका निवडणुकीत मिळेल” असे सूतक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

“आमची तयारी काय आहे हे आमचे विरोधक सांगू शकतात”

- Advertisement -

गोवा विधानसभा निवडणुकीवर बोलताना राऊत म्हणाले की, “आमची तयारी काय आहे हे आमचे विरोधक सांगू शकतात, गोवा राज्य लहान जरी असलं तरी देशाचे पंतप्रधान फार लक्ष घालतायंत. कालच येऊन गेले… गोवेकरांना त्यांचा इतिहास सांगतायत…गोवेकरांना इतिहास माहित आहे.. आणि विशेषत: शिवसेनेला गोव्याचा इतिहास सर्वात जास्त माहित आहे कारण गोव्याच्या लढ्यात महाराष्ट होता म्हणून गोव्यातील मुळचा प्रमुख पक्ष आहे त्या पक्षाचे नाव महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षं असं आहे…. राज्यकर्ता होता गोव्याचा हे समजून घेतले पाहिजे…. शिवसेना गोव्यात 11 जागा लढतेय पेंडण्यापासून ते वास्कोपर्यंत गोव्याच्या दोन्ही बाजूला शिवसेनेचे उमेदवार आहेत. ख्रिश्चन, हिंदू, मराठी, सर्व म्हणजे अख्खा गोवा आमचा आहे.”

“आज मंत्री आदित्य ठाकरे वास्कोमध्ये सभा घेणार आहेत. मग पेंडण्यात सभा होईल. भेटीगाठी आहेत त्यांच्या काही… उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात साखळी येथे सभा आहे त्यानंतर म्हाप्सामध्ये सभा आहे. अशाप्रकारे गोव्यात आमचा प्रचार आणि प्रसार, विस्तार सुरु आहे. इतक्या वरचं आम्ही थांबणार नाही…तर विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यामध्ये लोकसभेची तयारी आम्ही सुरु करणार आहोत. गोव्यात लोकसभेच्या जागा लढणार तयारी सुरु करणार आहोत,” अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत 22 जागा निवडूण येण्याच्या केलेल्या विधानावर प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले की, “22 जागा ना… जिंकू द्याना.. ते नेते आहेत त्यांच्या पक्षाचे आणि नेत्याला असं आत्मविश्वास पूर्ण बोलणं आवश्यक असतं. आम्हीही बोलतो 11 पैकी 11 जागा जिंकू. काँग्रेस बोलतं आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आप म्हणतयं पूर्ण बहुमत मिळेल, तृणमूल काँग्रेसला वाटते आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल,” असही राऊत म्हणाले आहेत.

“गोवा मुक्ती लढ्यावेळी आज बोलणारी लोकं कुठं होती?”

“गोव्याच्या लढ्याबद्दल आज जे लोकं बोलतायत ते कुठे होते नेमके त्या विचारांचे लोकं.. याविषयी कुठे नोंदी सापडतायत का. पण कुठे सापडल्या नाही अशा नोंदी, गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र, राममनोहर लोहिया, समाजवादी लोक आणि गोव्यातील क्रांतिकारक होते. या मोजक्या लोकांनी मिळून गोवा स्वतंत्र केला. इतर कोणी नव्हते 1961 सालापर्यंत इथे कोणी आले नव्हते आमच्या मराठी माणसांशिवाय… गोव्याने सर्वांनाच भरभरून दिलं आहे. अख्खा देश गोव्यात येतो. गोवा देशाचा भाग आहे. गोव्यानं इंदिरा गांधी, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे या सर्वांना दिलं. गोव्याची परंपरा आहे देण्याची. गोवा ही देवभूमी आहे. देशाचे पंतप्रधान जर दिल्लीतील संसद, पार्लमेंटची काम सोडून जर येतात तर निवडणुका आहेत. आमचे पक्ष निवडणुका लढतायत. पंतप्रधानांनी येण्याची गरज नव्हती. पंतप्रधानांना दिल्लीत बसूनही हे काम करता आले असते. देशाचे पंतप्रधान जर वारंवार येतात तर आम्ही आलो की तुम्ही प्रश्नचिन्हा का उपस्थित करतात” असा सवालही राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या सभावर बोलताना राऊत म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्येही पंतप्रधानांच्या 20 सभा झाल्या होत्या. केरळलाही झाल्या होत्या, आणि पंजाबलाही झाल्या. पंतप्रधान जेव्हा सभांसाठी जातात तेव्हा फार मोठा सरंजाम असतो, माहोल असतो, लोकं येतात, ऐकतात.. देशाचे पंतप्रधान काय वेगळं आपल्याला देतील या अपेक्षेत असतात. साधा मुख्यमंत्री जरी गेला तरी अपेक्षा असतात. इथे पंतप्रधान आहेत, महाराजा आहेत. त्यामुळे फडणवीस बोलतात ते बरोबर आहे. मी तर म्हणतो त्यांना ४० पैकी ४२ जागा मिळू दे.”

काँग्रेसने गोव्याला 40 वर्षे वनवासात नेले या पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले की, “गोवा गोल्डनचं आहे आणि या गोल्डन गोव्यावर तुम्ही फार उशीरा आले आहात. गोवा स्वतंत्र झाला, स्थिरस्थावर झाला. इंदिरा गांधी यांनी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. पंडित नेहरुंनी त्याकाळी इथे मोठं काम केले, पंडित नेहरु आणि पोर्तूगीज, गोव्याचा स्वतंत्र चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. कोणाला जर तो माहित नसेल तर समजून घेतला पहिजे,” असही राऊत म्हणाले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -