घरCORONA UPDATELockdown : सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या!

Lockdown : सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या!

Subscribe

एमसीएक्स एक्स्चेंजवर बुधवारी ट्रेडिंगवेळी ५ जून २०२० च्या सोन्याच्या वायदा दराने ४६ हजार ६७० रुपये प्रति ग्रॅमची उंची गाठत नवीन रेकॉर्ड बनविला आहे.

सध्या सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. बुधवारी सोन्याच्या किंमतीत नवे रेकॉर्डवरच्या स्तरावर नोंदविण्यात आले. एमसीएक्स एक्स्चेंजवर बुधवारी ट्रेडिंगवेळी ५ जून २०२० च्या सोन्याच्या वायदा दराने ४६ हजार ६७० रुपये प्रति ग्रॅमची उंची गाठत नवीन रेकॉर्ड बनविला आहे. हा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० च्या वायदा दराने बुधवारी ०.८५ टक्के म्हणजेच ३९६ रुपयांची वाढ नोंदविली आहे. हा दर ४६ हजार ८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. हा सोन्याचा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे.

याशिवाय वायदा बाजारामध्ये ही चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर मे २०२० च्या चांदीचा वायदा भाव १.५२ टक्के म्हणजेच ६६४ रुपयांनी वाढून ४४ हजार ४२० रुपये प्रति किलो झाला आहे. याचवेळी जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, सोन्याची किंमत आज ३.७६ डॉलरने घटली आहे. तर जागतिक वायदा बाजारची किंमत ही ०.०६ डॉलरने घटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढविल्याने देशातील बाजारपेठा बंद राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -