घरCORONA UPDATECoronavirus : कौतुकास्पद! बहिण-भावाची जोडी कोरोनाची लढतेय

Coronavirus : कौतुकास्पद! बहिण-भावाची जोडी कोरोनाची लढतेय

Subscribe

माझी बहीणच माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान असल्याचे पवन यांनी म्हटले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. डॉक्टर, आरोग्य खात्याचे कर्मचारी, औषधांची दुकाने, पोलीस, माल वाहतूक करणारी रेल्वे सेवा, सफाई कर्मचारी कोरोनाच्या संकाटाशी दोन हात करताना दिसत आहेत. आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी स्वत:ची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व प्रशासकीय अधिकारीही कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत. या प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक असणारे पश्चिम बंगालमधील कूचबिहारचे जिल्हाधिकारी पवन कडयान यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी अशा संकटाच्या प्रसंगी आपल्याला प्रेरणा देणारी गोष्ट कोणती आहे हे सांगितलं होतं. माझी बहीणच माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान असल्याचे पवन यांनी म्हटले होते.

याआधी पवन कडयान हे पश्चिम बंगालच्या अर्थ विभागामध्ये सहाय्यक सचिव होते.

कूचबिहारच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त होण्याआधी पवन हे पश्चिम बंगालच्या अर्थ विभागामध्ये सहाय्यक सचिव होते. मागील अनेक दिवसांपासून कूचबिहारमध्ये कोरोनाविरुद्धची लढाई कशापद्धतीने सुरु आहे यासंदर्भात पवन सोशल नेटवर्किंगवरुन माहिती देत आहेत. बेघर लोकांना सार्वजनिक ठिकाणी सुरु असणारे अन्न वाटप असो किंवा सॅनिटायझरची निर्मिती असो पवन सर्व अपडेट्स सोशल नेटवर्किंगवरुन देताना दिसत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

सख्खी बहीण एम्स रुग्णालयात कार्यरत

एकीकडे पवन हे जिल्हाधिकारी म्हणून आपली जबाबदारी चोख पार पडत असतानाच दुसरीकडे त्यांची सख्खी बहिण ही नर्स आहे. ही सध्या दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहे. आपल्या बहिणीचे काम पाहून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे पवन सांगतात.

बहिणीपासून ऊर्जा मिळते

आपल्या बहिणीसंदर्भात पवन यांनी एक ट्विट केलं होतं. “दैनंदिन काम करण्याची ऊर्जा मला हिच्यापासून मिळते… मला माझी बहिण डॉक्टर कविता कडयानचा अभिमान आहे. ती नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमधील कोविड-१९ रुग्णांच्या आयसीयुमध्ये काम करत आहे,” असं पवनने या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

नीती आयोगाने केले कौतुक

नीती आयोग (NITI) च्या ट्विटर हॅण्डलवरुनही पवनची ही पोस्ट रिट्विट करण्यात आली आहे. “डॉक्टर कविता आणि तिच्यासारख्या आरोग्य सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आपला विजय व्हावा, यासाठी लढत आहेत,” असं नीती आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -