घरताज्या घडामोडीतटकरेंनी काढला ठाकरे-पवारांच्या दोस्तीचा मुद्दा, राज्यपालांची त्यावरून कोपरखळी

तटकरेंनी काढला ठाकरे-पवारांच्या दोस्तीचा मुद्दा, राज्यपालांची त्यावरून कोपरखळी

Subscribe

स्वर्गीय बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदाच्या उपचारांमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले होते, असं वक्तव्य माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केलं. त्यावरून भगतसिंह यांनीही त्यांचीच री ओढली.

पुणे – दोन वेगळ्या विचारांचे व्यक्ती एकत्र आले अन् आघाडी बनवली, अशी कोपरखळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावली. सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. ते आज स्वर्गीय बालाजी तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलते होते. स्वर्गीय बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदाच्या उपचारांमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले होते, असं वक्तव्य माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केलं. त्यावरून भगतसिंह यांनीही त्यांचीच री ओढली.

हेही वाचा – माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा; अखेर राज्यपालांचा माफीनामा

- Advertisement -

राज्याच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, मुंबई आर्थिक राजधानी, महत्मा गांधीं आणि हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर सर्वत्र टीका झाली होती. त्यांची विधाने त्यांनाच अनेकदा धोक्यात आणतात. जनतेचा रोष पाहून ते माफीनामाही प्रसिद्ध करतात.

कोरोना काळात मंदिरे उघडण्यासाठी तत्कालीन विरोधकांनी रान उठवले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रयुद्धही रंगले. या पत्रयुद्धात राज्यपालांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून वादाला ठिणगी दिली होती. यावरून अमित शहा यांनी त्यांनी न बोलण्याची तंबी दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मला न बोलण्याचे आदेश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खुलासा

मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाजूला केल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. त्या लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगत सिंह यांनी केल्यानं मोठा वादंग माजला होता. त्या विधानावरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर माफी मागितली. त्यांच्या या वक्तव्यानंतरही केंद्राकडून त्यांना जास्त न बोलण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा – महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना लवकर निरोप दिलेला बरा!

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -