घरताज्या घडामोडीVideo Viral : हसले अन् फसले... राज्यपालांनी सावित्रीबाईंच्या लग्नाबद्दल केलेल्या विधानावर काँग्रेसची...

Video Viral : हसले अन् फसले… राज्यपालांनी सावित्रीबाईंच्या लग्नाबद्दल केलेल्या विधानावर काँग्रेसची खोचक टीका

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज(गुरूवार) पासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून विरोधकांनी एकच गदारोळ केला होता. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले-सावित्रीबाईंच्या लग्नाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्ताधारी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते, अशी खोचक टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसनं काय केलंय ट्विट?

काय ते हातवारे, काय ते हसणं…सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव!, असं ट्विट करत काँग्रेसने राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

पुण्यात १४ फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं लग्न १० व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय १३ वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय विचार करत असतील?, एका प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे. तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्याच संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक लोकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

सावित्रीबाई फुलेंच्या वक्तव्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये २७ फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यपालांनी माफी मागावी, अशा प्रकारची मागणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांना धारेवर धरलं आहे. कोश्यारी सभागृहात भाषण करत असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर कोश्यारी विधिमंडळ सभागृहातून बाहेर निघून गेले. परंतु त्यांनी अभिभाषणाचं संपूर्ण वाचनच केलेलं नाही. औरंगाबाद आणि पुण्यात केलेल्या दोन वक्तव्यांवरून हा वाद सध्या सुरु आहे.


हही वाचा : OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का नसून ‘धोका’ – पंकजा मुंडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -