घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराज्यपालांचे वक्तव्य तर्कहिन : भुजबळ

राज्यपालांचे वक्तव्य तर्कहिन : भुजबळ

Subscribe

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसाबददल केलेल्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुंबई आणि महाराष्ट्राचा इतिहास पटवून देतांनाच राज्यपालांचे वक्तव्य तर्कहिन असल्याचे म्हटले आहे.

नाशिकमध्ये बोलतांना भुजबळ म्हणाले, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुळात व्यापारी समाज आहे. राजस्थानमध्ये काही भागात वाळवंटच आहे. ते लोक बाहेर पडलेले आहेत. बिर्लांचा इतिहास पाहिला, तर ते राजस्थानातून कलकत्याला गेले. मुंबईतही ही सगळी मंडळी आली आणि हे महत्व वाढलं. पण मुंबईच मराठी माणसांचे कष्ट विसरता येत नाही. मुंबईत नाशिकमधून पाणी, पुण्यातून भाजीपाला, वीज राज्यभरातून जाते. त्यामुळे ती नसेल तर काय होईल, असा प्रश्न विचारता येईल. अहमदाबादमध्ये ज्या वेळेला ६० ७० कापड गिरण्या होत तेव्हा मुंबईतही ६४ गिरण्या होत्या. मुंबईचे हवामान हा सुध्दा महत्वाचा मुददा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसते. दिल्ली सारखं हवेच प्रदुषण नसते. एका बाजूनी हवा आली की दुसरया बाजुने निघून जाते. मुंबईची बंदरं, विमानतळ, बॉलीवूडच महत्वही खूप आहे. यात फक्त गुजरातचे आणि राजस्थानचे लोक नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी केलेले वक्तव्य तर्कहीन असल्याच टिका भुजबळ यांनी केली.

काय म्हणाले भुजबळ

  • राज्यपाल निर्विवाद असले पाहिजेत
  • मुंबई ही कोळी आणि आगरी समाजाची आहे.
  • देशातील अनेकांनी मुंबईत येउन मुंबईच्या भरभराटीला हात लावले.
  • मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे कोणी नाकरू शकत नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -