घरमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणूक: मतदान झालं आता निकालाची प्रतिक्षा

ग्रामपंचायत निवडणूक: मतदान झालं आता निकालाची प्रतिक्षा

Subscribe

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठीचं मतदान आज पार पडलं. दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ६६ टक्के मतदान झालं. राज्यातील १२ हजार ७७६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठईचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. मात्र, काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं. सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेली निवडणुकीसाठीची लगबग संपली असून शुक्रवारी लाखो उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांना १८ जानेवारीची म्हणजेच निकालाच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होतं. दरम्यान, शुक्रवारी १२ हजार ७७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आज पार पडलेल्या मतदानाला गालबोट लागलं. दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट लागलं. कुसेगावमधील दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. आधी या दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यातून दोन्हीकडचे कार्यकर्ते भिडले.

- Advertisement -

दरम्यान, आज पार पडलेल्या मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या. यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब झाला. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खासदार रक्षा खडसे, शिवसेना आमदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला.


हेही वाचा – सरपंच-सदस्यपदाचा लिलाव; उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -