घरमहाराष्ट्रयेस बँकेवर निर्बंध घालण्याआधीच गुजरातच्या कंपनीने काढले २६५ कोटी

येस बँकेवर निर्बंध घालण्याआधीच गुजरातच्या कंपनीने काढले २६५ कोटी

Subscribe

रिझर्व्ह बँकेने गुरूवारी येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना बँकेतून ५० हजार रूपयांची रक्कम काढता येणार आहे

आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना बँकेतून प्रति महिना ५० हजार रुपयांची रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे लाखो खातेधारक अडचणीत सापडले आहेत. गुजरातमधल्या कंपनीने मात्र रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी येस बँकेतून २६५ कोटी रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीने ही संपूर्ण रक्कम दुसऱ्या बँकेत वळती केली आहे. या कंपनीने साधलेल्या टायमिंगकडे सर्व स्तरातून संशय व्यक्त केल जात आहे.

”स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम केंद्र सरकारकडून मिळाली होती. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ही रक्कम पाठवण्यात आली होती. ती रक्कम स्थानिक येस बँकेच्या शाखेत जमा करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच येस बँकेच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आणि बँक ऑफ बडोदाच्या शाखेत ही रक्कम वळती केली,” अशी माहिती बडोदा महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) सुधीर पटेल यांनी दिली. आम्ही एस बँकेच्या स्थानिक शाखेत ती रक्कम जमा केली होती. मात्र बँकेसमोर आर्थिक समस्या असल्याचे लक्षात येताच आम्ही तो निधी बँक ऑफ बडोदात जमा केला असेही पटेल यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील १०९ बँकांना फटका

रिझव्‍‌र्ह बँकेने ‘येस’ बँकेवर निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या आहेत. या बँकांचे सर्व ‘ऑनलाईन’ व्यवहार ठप्प झाले असून व्यापाऱ्यांनी येस बँकेशी संबंधित धनादेशही स्वीकारण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली. त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका आणि काही पत संस्थांचाही समावेश आहे.


हेही वाचा –दिल्ली हिंसाचार: धार्मिक वार्तांकन केल्यामुळे दोन वृत्तवाहिन्यांवर बंदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -