घरमहाराष्ट्रमोदींच्या प्रभावामुळे मी भाजपमध्ये आलो - गुलाब करंजुले

मोदींच्या प्रभावामुळे मी भाजपमध्ये आलो – गुलाब करंजुले

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रभावित झाल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे मत माजी नगराध्यक्ष गुलाब करंजुले यांनी व्यक्त केले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रभावित झाल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणासोबतही मतभेद नव्हते. मी स्वखुशीने राजीनामा देऊन तो पक्ष सोडला असल्याचे माजी नगराध्यक्ष गुलाब करंजुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. सोमवारी कल्याणच्या भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव गुलाब करंजुले यांनी त्यांचा मुलगा अभिजित करंजुले यांच्यासह भाजप मध्ये प्रवेश केला. यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत करंजुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारच विजयी

‘लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर २१ एप्रिल पर्यंत काही अपवाद वगळता माझ्याशी संपर्क ठेवलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतच मी भाजपमध्ये प्रवेश घ्यायला हवा होता. त्यावेळेस मी भाजपमध्ये असतो तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातुन भाजप उमेदवार राजा वानखेडे हे नक्कीच विजयी झाले असते. आगामी विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष किसनराव तारमाळे, नगरसेवक सुनील सोनी, तुळशीराम चौधरी, जिल्हा सरचिटणीस संजय आदक, खानजी धल, कमलाकांत राय, राजेश कौठाले, याकूब सय्यद आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -