घरमहाराष्ट्ररवी राणांनी शब्द मागे घ्यावा, तुमच्या वादात ४० आमदारांना बदनाम का करता?...

रवी राणांनी शब्द मागे घ्यावा, तुमच्या वादात ४० आमदारांना बदनाम का करता? गुलाबराव पाटलांचे खडेबोल

Subscribe

मुंबई – ५० खोके घेऊन बच्चू कडू (Bacchu Kadu) शिंदे गटात आले असल्याचा आरोप आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला होता. त्यांना बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. आरोप सिद्ध न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दोघांचा कलगीतुरा सुरू असतानाच आता आमदार गुलाबराव पाटील यांनीही यात उडी मारली आहे. तुमच्या वादामुळे ४० आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही, असे गुलाबराव पाटलांनी रवी राणा यांना खडेबोल सुनावले आहेत. गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) आज माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

हेही  वाचा – राजकीय स्वार्थासाठी ठाकरेंकडून मतांची पेरणी, आशिष शेलारांचा आरोप

- Advertisement -

गुलाबराव पाटील म्हणाले की, तुमच्या वादामुळे ४० आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणांना आवर घाला अशी फडणवीसांना विनंती करतो. रवी राणा यांनी शब्द मागे घ्यावा. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजेच सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. त्यांनी त्यांचा शब्द मागे घ्यावा. येथे कोणीही बिकाऊ नाही. ४० वर्षांचा अनुभव घेऊन सगळेजण इकडे आले आहेत. त्यामुळे दोघांनीही शांत बसावं. तसंच, याप्रकरणात देवेंद्र  फडणवीसांनी रवी राणा यांना समज द्यावी, अशी मागणीही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेतील आमदारांसह महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या अनेक अपक्ष आमदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. यावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. आधीपासूनच या दोघांमध्ये वाद आहेत. त्यातच, राणा यांनी ५० खोकेवरून बच्चू कडू यांना डिवचलं, त्यामुळे कडू चांगलेच संतापले आहे. यामुळे बच्चू कडू यांनी रवी राणा अल्टिमेटम दिला आहे. मी ५० खोके घेतले असल्याचा १ नोव्हेंबरपर्यंत पुरावा द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई सामोरे जा, असा इशारा देण्यात आला आहे. तसंच, बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरला राज्याच्या राजकारणात काय राजकीय नाट्य पाहायला मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एक तर तोंड बंद करा नाहीतर…; एसआरए घोटाळ्यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर संतापल्या

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -