घरमहाराष्ट्रजो जेलमध्ये जात नाही तो शाखाप्रमुख नाही, शिवसेना नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

जो जेलमध्ये जात नाही तो शाखाप्रमुख नाही, शिवसेना नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

आमच्या नादी लागू नका असा इशारा देखील पाटील यांनी राज ठाकरे यांना दिला. आम्ही कुपोषित बालके गुबगुबीत करतो. समोरचा मांडीवर घेतो.आमचं पोट्ट दत्तक घेतल्याशिवाय लोकांना जमत नाही.

कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरातील कॅम्प नंबर ३ मधील चोपडा परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात व कॅम्प नंबर ४ मधील गजानन नगरात काल रात्री जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेंव्हा गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांना ईशारा देत एक वादग्रस्त वक्तव्य केले ते असे की, ‘ज्याच्यावर केस नाही तो शाखाप्रमुख नाही आणि जो जेल मध्ये जात नाही तो तालुकाप्रमुख नाही. म्हणून आमच्या नादी लागू नका डॉक्टर ऑफ जेल ही शिवसेनेची पदवी आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना उपनेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे .’

ते पुढे म्हणाले की ” तुम्हाला पैसे भेटतात, तुम्ही चांगले भाषण करतात हे ठीक आहे. पण आमच्या नादी लागू नका असा इशारा देखील पाटील यांनी राज ठाकरे यांना दिला. आम्ही कुपोषित बालके गुबगुबीत करतो आणि समोरचा मांडीवर घेतो. आमचं पोट्ट दत्तक घेतल्याशिवाय लोकांना जमत नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

- Advertisement -

बिर्याणी करताना तेजपत्ता, लवंग, बाजा, पत्ताफुल टाकले जाते आणि बिर्याणी झाल्यावर ह्या वस्तू बाहेर काढून बिर्याणीवर ताव मारल्या जातो, अशी अवस्था मुस्लिमांची करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष टोमणा गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मारला. यावेळी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, सुनील सुर्वे, शेखर यादव, स्वप्नील बागूल, सुरेंद्र सावंत, युवासेना उपजिल्हाधिकारी सोनू चानपूर, युवासेना अधिकारी सुमित सोनकांबळे, बाळा श्रीखंडे, उपशहरप्रमुख अरुण आशान, दिलीप गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे जगदीश तेजवाणी, परमानंद गेरेजा आदींसोबत विभागप्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -