घरमहाराष्ट्रH3N2 चा धोका वाढला, नव्या विषाणूवर आरोग्यमंत्री काय म्हणाले? वाचा...

H3N2 चा धोका वाढला, नव्या विषाणूवर आरोग्यमंत्री काय म्हणाले? वाचा…

Subscribe

कोरोना संकटामुळे लोकांची विस्कटलेली आर्थिक घडी आता कुठे रूळावर आणण्यासाठी लोक बाहेर पडू लागले आहेत. तितक्यात आता आणखी एका नव्या विषाणूने एन्ट्री केलीय.

कोरोना संकटामुळे लोकांची विस्कटलेली आर्थिक घडी आता कुठे रूळावर आणण्यासाठी लोक बाहेर पडू लागले आहेत. तितक्यात आता आणखी एका नव्या विषाणूने एन्ट्री केलीय. देशभरात ताप, खोकला आणि थकवा आदि लक्षणांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून कोरोनानंतर आता एच ३ एन २ नावाचा विषाणू पसरू लागला आहे. हरियाणा, कर्नाटकानंतर आता महाराष्ट्रातही H3N2 इन्फ्लूएंझाने लोकांचा बळी घ्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात H3N2 मुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर आणि अहमदनगरमध्ये रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे होत असलेली गंभीर परिस्थिती पाहता आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुढे येत या नव्या विषाणूवर माहिती दिली आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या प्रसारावर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावर माहिती दिली. १२ मार्चला मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ३५२ रुग्णांची नोंद झाली आहे. एच3एन2 दोन दिवसात बरा होतो. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. अंगावर आजार काढू नका, खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

- Advertisement -

या विषाणूवर कुठेही औषध नाही. त्यामुळे याचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच खासगी आणि शासकीय रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली. तसंच सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करणे, मास्क वापरणे, हाथ धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या सारख्या उपाययोजनांचा अबलंब करावा, त्याच बरोबर गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे. अशी कळकळीची विनंती तानाजी सावंत यांनी केली.

…अशी आहेत लक्षणे
सर्दी, ताप, खोकला लक्षणे आहेत. विशेष आणि स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसताय. डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करावेत असे आया महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरात ‘एच3एन2’ या विषाणूचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे नाही. या चारही रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -