घरमहाराष्ट्रसहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून केले आंदोलन

सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून केले आंदोलन

Subscribe

'प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटने'कडून सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत सतत पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत. तसेच, विभागात वरिष्ठ अधिकारी जागेवर भेटत नसल्याने ‘प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटने’च्या वतीने सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्या खुर्चीला हार घालून निषेध करण्यात आला.

अधिकारी भेटत नसल्याने केले आंदोलन

‘प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटने’समवेत दिव्यांगाचे विविध प्रश्न आणि त्याच्यासाठी उपायुक्त नेमण्याच्या मागणीसाठी बुधवार रोजी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर दिव्यांगाने आपले प्रश्न देखील मांडले होते. मात्र पालिकेकडे पाठपुरावा करूनही माहिती मिळत नसल्याने ‘प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटने’ आंदोलन सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून केले आंदोलन छेडले. तसेच आज ‘प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनें’ने नागरवस्ती विभागात धडक कारवाई देखील केली. मात्र त्यादरम्यान नागरवस्ती विभागात एकही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित नव्हता. त्याचा निषेध करण्यासाठी दिव्यांग नागरिकांनी सहायक आयुक्त झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत त्यांच्या खुर्चीची पुजा करत निषेध केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -