घरमहाराष्ट्ररायगडावरील गाईडना आरोग्य विमा संरक्षण, शिवसेना वैद्यकीय कक्षाचा पुढाकार

रायगडावरील गाईडना आरोग्य विमा संरक्षण, शिवसेना वैद्यकीय कक्षाचा पुढाकार

Subscribe

मुंबई : पर्यटकांच्या डोळ्यासमोर किल्ले रायगडचा (History of Raigad Fort) इतिहास उभा करणाऱ्या गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या वतीने रायगडच्या गाईडना हे आरोग्य कवच देण्यात येणार आहे. 2 जून रोजी 350व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्य विमा संरक्षणपत्र सर्व गाईडना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे.

किल्ले रायगडावर एकूण 22 गाईड कार्यरत आहेत. तिथे येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची महती ते सांगत असतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ही सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत पराक्रमी राजांचा इतिहास या पर्यटकांना रोज सांगत असतात आणि त्याद्वारे आपला देदिप्यमान इतिहास पर्यटकांच्या डोळ्यासमोर उभा केला जातो. या गाईडना शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्तीपूजनाचे साहित्य दिले आहे.

- Advertisement -

तसेच गेल्या दोन वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून मुक्ताई गारमेंटतर्फे रायगडावर पाच ठिकाणी अखंड पुष्पहार सेवा हा अभिनव उपक्रम सुरू आहे. 19 फेब्रुवारी 2021पासून रायगडावरील राजसदर येथील श्री शिवछत्रपतींचा पूर्णाकृती मूर्ती. होळीचा माळ येथील पूर्णाकृती मूर्ती, शिरकाई देवीचे मंदिर, श्री जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी या सर्व ठिकाणी दररोज पुष्पहार अर्पण केले जातात.

त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईडना आरोग्य विमा संरक्षण. यामध्ये रायगड गाईड संघटनेचे अध्यक्ष पप्पू औकिरकर, रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेश झोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सीताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप अवकीरकर, सीताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशा एकूण 22 गाईडचा समावेश आहे. वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजारांचा समावेश आहे. यामध्ये गाईडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -