घरमहाराष्ट्रभंडारा सिव्हिल हॉस्पिटल आग : तीन बाळांचा मृत्यू आगीने, तर ७ बाळांचा...

भंडारा सिव्हिल हॉस्पिटल आग : तीन बाळांचा मृत्यू आगीने, तर ७ बाळांचा धुरामुळे – अहवाल

Subscribe

सात जणांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांनी दिले आदेश

भंडारा जिल्हा आग प्रकरणात हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर तसेच तीन आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागपूर विभागीय आयुक्तांच्या चौकशीनंतर हा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचेही आदेश टोपे यांनी दिले आहेत. आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील सामान्य रूग्णालयात ९ जानेवारी रोजी आग लागली होती. या आगीत शिशू युनिटमध्ये दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या आगीची चौकशी करण्यासाठीचे आदेश नागपूर विभागीय आयुक्तांना दिले होते. नागपूर विभागीय आयुक्त संजय कुमार यांनी चौकशीअंती बुधवारी रात्री अहवाल सरकारपुढे ठेवला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचे राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

रात्री एक वाजल्याच्या दरम्यान बेबी वॉर्मल कंट्रोल पॅनेलमध्ये स्पार्किंगनंतर या शिशू युनिटमध्ये आग लागली. आग लागल्याची घटना घडली तेव्हा काही बाळं ही ऑक्सिजनवर ठेवण्यात आली होती. प्लॅस्टिक मटेरिअलला आग लागल्याने या रूममध्ये धूर मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. या घटनेत तीन बाळांचा मृत्यू आगीमुळे तर ७ बाळांचा मृत्यू धुरामुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एक ते तीन महिन्याच्या वयोगटातील ही बालके होती. ज्या बालकांचे वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे अशा बाळांसाठीचा हा वॉर्ड होता. बांधकाम विभागाने फायर ऑडिट करण्याची गरज होती. पण २०१६ साली घाईगडबडीने या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले असे टोपे यांनी सांगितले. हॉस्पिटल हस्तांतरीत करताना आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. तसेच फायर ऑडिटचा प्रस्ताव हा अजुनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे.

- Advertisement -

कारवाई कुणावर ?

डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन – निलंबन
डॉ सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन – बदलीचे आदेश
अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी – निलंबन
सुशील अंबडे, बालरोग तज्ञ – सेवा समाप्त
ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज – निलंबित
स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स – सेवा समाप्त
शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स – सेवा समाप्त


 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -