घरCORONA UPDATEधक्कादायक: आरोग्य सेविका व कीटक नाशक कामगारही झाले 'कोरोनाग्रस्त'!

धक्कादायक: आरोग्य सेविका व कीटक नाशक कामगारही झाले ‘कोरोनाग्रस्त’!

Subscribe

थेट कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित क्षेत्रामध्ये जावून कोरोनाग्रस्तांचा शोध घेणाऱ्या या सैनिकांची योग्यप्रकारे प्रशासनाकडून काळजी घेतली जात नसल्याने त्यांनाही आजाराची लागण होवू लागली आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात अग्रेसर असलेले सैनिकच आता धारातीर्थ पडू लागले आहेत. आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्सनंतर आता आरोग्य सेविका आणि किटक नाशक विभागातील जंतूनाशकांची फवारणी करणारे कामगारही कोरोनाचे शिकार होऊ लागले आहेत. त्यामुळे थेट कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित क्षेत्रामध्ये जावून कोरोनाग्रस्तांचा शोध घेणाऱ्या या सैनिकांची योग्यप्रकारे प्रशासनाकडून काळजी घेतली जात नसल्याने त्यांनाही आजाराची लागण होवू लागली आहे.

कोरोना कोविड- १९च्या बाधित रुग्णांवर कस्तुरबासह अन्य रुग्णालयांमध्ये उपचार सुरु केले जातात. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचार करताना येथील डॉक्टरसह प्रत्येक कर्मचाऱ्यांची काळजी प्रशासनाकडून घेतली जाते. परंतु कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी हायरिस्क व लो रिस्कमधील व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा सर्व्हे करणे तसेच त्या परिसरांमध्ये शिबिर घेवून त्यांची तपासणी करणाऱ्या आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरसह नर्स, आरोग्य सेविका तसे किटक नाशक विभागातील कर्मचाऱ्यांची योग्यप्रकारे काळजी प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे राजकमल आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्यानंतर येथील नर्सची चाचणी करण्यात आली. तसेच रे रोड येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरलाही बाधा झाल्याने येथील दोन्ही आरेाग्य केंद्रे बंद करावी लागली आहे. त्यामुळे नर्सचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे. त्यातच आता  भायखळा येथील नवाब टँक येथील आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती  मिळत आहे.

- Advertisement -

याशिवाय आर- उत्तर विभागातील किटक नाशक विभागातील एका कामगारालाही कोरोनाची लागण झाली आहे. दहिसरमधील या किटक नाशक विभागातील कामगाराने वरळीतील झोपडपट्टीत जावून फवारणीचे कर्तव्य निभावले होते. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे कुठे तरी आरेाग्य केंद्र आणि दवाखान्यांमधील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविकांसह किटक नाशक विभागातील कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मैदानात थेट जावून सामना करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा नसून साधे जेवणही उपलब्ध होत  नाही. मुळात यासर्वांची प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना पोषक आणि सकस आहार देण्याचा प्रयत्नही केला जात नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती अभावी कितीही काळजी घेतली तरी अशा घटना घडतच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र, किटक नाशक विभागातील एक अपवाद वगळता सर्व कर्मचारी आपली खात्याने दिलेल्या नियमांनुसारच काम करत आहेत. परंतु ज्या कामगाराला बाधा झाली होती, तो कामगार वरळीत फवारणी करताना आपल्या नातेवाईकाकडे जावून जेवला आणि सर्व सहकाऱ्यांसह गाडीतून दहिसरला आला. त्यामुळे एका कर्मचाऱ्यामुळे अन्य कामगारांची कोरोना चाचणी दोन दिवसांमध्ये घेतली जाणार असल्याचे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, बाधित क्षेत्रांमध्ये आतमध्ये जावून हा कामगार काम करत असला तरी अद्यापही याची बाधा आमच्या कामगारांना झाली नाही. त्यामुळे सर्व कामगारांचेही विभागाने आभार मानत सर्व विभागांमध्ये किटक नाशक विभाग चांगल्याप्रकारे काम करत असल्याचाही दावा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -