घरताज्या घडामोडीMumbai Local Train: लोकल ट्रेनमधून पडलेल्या ८० वर्षीय वृद्धाला नुकसान भरपाई देण्याबाबत...

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधून पडलेल्या ८० वर्षीय वृद्धाला नुकसान भरपाई देण्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

Subscribe

भरलेल्या लोकलमधून पडून जखमी झाल्यास रेल्वे भरपाई देणार असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर लोकल ट्रेनमधून पडलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाला नुकसान भरपाई देण्याबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. १.५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून प्रत्यक्ष वैद्यकीय खर्चासाठी १.६ लाख भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २०११ मध्ये खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडल्यानंतर झालेल्या नुकसानीबद्दल १.५ लाख रूपयांच्या नुकसान भरपाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

खचाखच प्रवाश्यांनी भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे हा काही गुन्हा नाहीये किंवा ते गुन्हेगारी कृत्य असू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच हा वृद्ध(प्रवासी) दररोज कामावर प्रवास करतो. परंतु त्याच्याकडे तिकीट सापडले नाही म्हणून त्याला आपण जबाबदार ठरवू शकत नाही, असे देखील कोर्टाने म्हटलंय.

- Advertisement -

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हायकोर्टाच्या खंडपीठासमोर वृद्धाच्या डोक्याला आणि पायाला झालेल्या दुखापतीसाठी प्रत्यक्ष वैद्यकीय खर्चासाठी १.५ लाख रूपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणानंतर दुसरं प्रकरण म्हणजे एका ७५ वर्षीय वृद्धाला ३ लाख १० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. नितीन हुंडीवाला असं या वृद्धाचं(प्रवासी) नाव आहे. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी नितीन हुंडीवाला हे विक्रोळी येथील एका फर्मचे सल्लागार होते. ते त्यांच्या कार्यालयातून दहिसरहून त्यांच्या घराच्या दिशेने निघाले होते. कार्यालयातून घरी जाण्यासाठी विक्रोळीवरून दादरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ते विरार लोकल ट्रेनमधील द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढले. या डब्यात प्रचंड गर्दी होती. त्यामु्ळे ट्रेनमध्ये चढतेवेळी प्रवाशांच्या धक्क्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले. तसेच त्यांचा पाय घसरून ते प्लॅटफॉर्मवर पडले. त्यानंतर त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. १४ दिवस ते रूग्णालयात दाखल होते. त्यांच्या उपचारावर जवळपास दोन लाख रूपये खर्च करण्यात आले.

- Advertisement -

मात्र, उपचारानंतरही ते पूर्णपणे बरे झालेले नाहीयेत. परंतु हुंडीवाल यांनी नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव घेतली असता रेल्वे न्यायधिकरणाने त्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीत त्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश हायकोर्टाने न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर देण्यात आला. त्यांना जवळपास ३.१० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने रेल्वेला दिले आहेत.


हेही वाचा : IRCTC ALERT: आज रात्री साडेतीन तासांसाठी बंद राहणार ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा, ‘या’ सेवांवर होणार परिणाम


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -