घरमहाराष्ट्रव्यावसायिक अभ्यासक्रम, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो सरकार आपल्या सोबत - उदय सामंत

व्यावसायिक अभ्यासक्रम, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो सरकार आपल्या सोबत – उदय सामंत

Subscribe

राज्यात कोरोनाचं संकट असताना विद्यापीठांच्या परीक्षांवरून गोंधळ सुरू आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी परीक्षांसंदर्भात निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयात बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांबद्दल निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर विरोधकांकडून बॅकलॉग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बी.ए, बी.एस्सी आणि बी. कॉम या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. त्याचबरोबर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही घेतली जाणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १९ जून रोजी केली होती. त्यानंतर विरोधकांनी बॅकलॉग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना सरकार तुमच्या सोबत आहे, असं आवाहन केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा – इंधन दर वाढीचे ग्रहण काही सुटेना; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

- Advertisement -

उदय सामंत यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे. “व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करताहेत. माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे,” असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -