कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक संकट असताना सर्वसामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीच ग्रहण लागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सोळाव्या दिवशीही वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले असून डिझेलचे दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. भारतात सर्वाधिक दर मुंबईत आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी इंधनाच्या दरात केलेली वाढ ही काही पैशांची असली, तरी सलग पंधरा दिवसांपासून होत असलेल्या वाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांसमोर मवं संकट उभं ठाकलं आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली असून राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७९ रुपये ५६ पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून ७८ रूपये ८५ प्रति लिटर एवढे झाले आहेत.
कोणत्या शहरात काय आहेत दर
शहर पेट्रोल प्रति लीटर डिझेल प्रति लीटर
दिल्ली ७९.२३ ७८.२७
मुंबई ८६.०४ ७६.६९
चेन्नई ८२.५८ ७५.८०
कोलकत्ता ८०.९५ ७३.६१
नोएडा ८०.१६ ७०.७९
रांची ७९.३८ ७४.४०
बंगळरु ८१.८१ ७४.४३
पटना ८२.३९ ७५.६७
चंदीगड ७६.२६ ६९.९६
लखनऊ ८०.०६ ७०.७१
हेही वाचा – पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे; मनमोहन सिंग यांचा सल्ला