घरक्राइमगोवंश हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, तत्काळ दोषींना अटक करण्याची मागणी

गोवंश हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, तत्काळ दोषींना अटक करण्याची मागणी

Subscribe

नाशिक : समाजात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने समाजकंटकांनी ऐन वसुबारसच्या दिवशी गायींची कत्तल केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. भागूरच्या दारणा नदीवरील पुलाखाली एक गायीसह तीन वासरे मृत अवस्थेत आढळून आले होते. यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात संतप्त भावना उमटली होती. त्यावेळी संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारे त्याचे पडसात उमटले नाही. परंतु घटनेला चार दिवस होऊनही तपासात कोणतीही विशेष प्रगति झाली नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी साटप व्यक्त केला. गुरवारी (दी.२७) सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढत निषेध नोंदवला. यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांना निवेदन देत दोषींचा तत्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

वसुबारसच्या दिवशी गोवंश मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर नागरिक व विविध संघटना चांगल्याच आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी रास्ता रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रास्तारोको सुरूच राहील अशी भूमिका घेतली होती. परंतु पोलीस प्रशासनाने जलद गतीने तपास करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देत शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर नागरिकांनी संयमाची भूमिका घेतली. परंतु चार दिवसांनंतरही घटनेचा छडा लागलेला नसल्याने अखेर विविध हिंदुत्ववादी, संघटनांनी एकत्र येत निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी एकनाथराव थेटे, रामसिंग बावरी, गजू घोडके, पुरषोत्तम आव्हाड, विनोद थोरात, कैलास देशमुख, हभप राहुल महाराज गायकवाड, तानाजी करंजकर, संदीप मुठाळ,नारायण गायकवाड, संगीता घुगे, विक्रम सोनवणे, प्रसाद आडके, श्रीकांत क्षत्रीय, रमेश मानकर आदींसह संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -