घरताज्या घडामोडीहिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत; मनसेची केंद्र सरकारकडे मागणी

हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत; मनसेची केंद्र सरकारकडे मागणी

Subscribe

कश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu & Kashmir) दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) टार्गेट केले जात आहे. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबारामुळे (Firing) काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायानाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आता कश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केंद्राकडे हिंदूंना बंदुकांचे परवाने देण्याची आणि बंदुका चालवण्याची मागणी केले आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

“ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसच बंदुका आणि ते चालवण्याच प्रशिक्षण केंद्र सरकारने दिल पाहिजे.”, असे ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे आता केद्र सरकार मनसेच्या या मागणीची दखल घेत याबाबत पावले उचणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर-काश्मिरी किंवा हिंदू नागरिकांची निवडक हत्या केली जात आहे. मागील महिन्यात अशा तीन घटना घडल्या होत्या. त्यामुळे तेथील अल्पसंख्याकांची चिंता वाढली होती. सलग घडलेल्या या दोन हत्यांमुळे १९९० साली घडलेल्या कश्मीरी हिंदू पंडितांच्या हत्याकांडाची तर ही पुनर्रावृत्ती नाही ना असा प्रश्न प्रत्येक कश्मीरी हिंदूंना पडला आहे. विशेष म्हणजे ज्या हिंदूंना दहशतवाद्याकडून टार्गेट करण्यात येत आहे ते कश्मीरमध्ये राहण्यास येत असलेले कश्मीर पंडित आणि हिंदू नागरिक आहेत. यातील काहीजण मजुर असून कश्मीर खोऱ्यातील हिंदूमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी त्यांना निशाणा करत असल्याचे बोलले जात आहे.

उच्चस्तरीय बैठक

- Advertisement -

गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आज नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी होणाऱ्या या बैठकीत एनएसए डोभालही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख पंकज सिंग हेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा – Monsoon Update: आता मान्सून ईशान्येकडे पोहोचला, देशाच्या ‘या’ भागांत कोसळणार; IMDचा ताजा अंदाज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -