घरताज्या घडामोडीNCP : स्थापनेनंतर दोन वर्षात मिळालेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा २३ व्या वर्षी...

NCP : स्थापनेनंतर दोन वर्षात मिळालेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा २३ व्या वर्षी रद्द, वाचा राष्ट्रवादीचा इतिहास

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला व अध्यक्ष शरद पवार हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र, असे असले तरी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला विषेश महत्त्व आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला व अध्यक्ष शरद पवार हा मोठा धक्का मानला जातो. मात्र, असे असले तरी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला विषेश महत्त्व आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला हा पक्ष २००४ ते २०१४ वर्षे सलग महाराष्ट्राच्या सत्तेवर राहिला. जाणून घेऊयात स्थापनेपासून सत्तेत कायम वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जडणघडण कशी झाली? (History of NCP who abolished national status)

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहले होते. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. ए. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

- Advertisement -

या निलंबनानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. ए. संगमा यांच्या साथीने १० जून १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली होती. दादरच्या शिवाजी पार्क येथे पक्षाची स्थापना करण्यात केली. मुळ विचारधारा काँग्रेसची असल्यामुळे पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावे असे ठरवण्यात आले होते.

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या २ महिन्यात राज्यात निवडणुका लागल्या. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत सत्तेत आला. सन १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता. विशेष म्हणजे पक्षाच्या 23 वर्षांच्या इतिहासात हा पक्ष फक्त ५ वर्ष सत्तेबाहेर राहिला आहे.

- Advertisement -

पक्षाचे चिन्ह विशेष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. विशेष म्हणजे या घडाळ्यातील १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.

मराठा नेतृत्वाला विशेष महत्व

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक निरिक्षण कायम नोंदवण्यात आले आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी हा मराठा नेतृत्वाचा आणि मतदारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये कायम मराठा समाजाला जास्त संधी दिलेली पहायला मिळते. शरद पवारांचे राजकारण हे नेहमी राजकीय बेरजेचे राहिलेले असल्याने अनेक ओबीसी, दलित आणि मुस्लिम समुदायातले नेतेही या पक्षातून वर आलेले पहायला मिळतात.

दरम्यान, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक ही त्यातली काही नावे. पण ही काही नावे वगळता बाकी नेते बहुतांशाने मराठा समाजातून येतात. केवळ नेतेच नाही तर राष्ट्रवादीचा मतदार हाही सर्वाधिक मराठाच आहे असेही कायम म्हटले गेले.

2014 च्या दोन्ही निवडणुका आणि 2019ची लोकसभा निवडणूक, या तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा कमी झाल्या याचे कारण मराठा मतदार त्यांच्यापासून दुरावला असे म्हटले गेले आणि त्याच वेळेस तो प्रामुख्याने भाजपाकडे गेला त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या असेही दिसले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला

पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, सोलापूर अशा शहरांमध्ये आणि इतर महानरपालिकांमध्ये या पक्षाने ताकद निर्माण केली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर काही ग्रामीण महाराष्ट्र हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते

प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत.

२०१९मध्ये पुन्हा सत्तेत

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.

1999 ते 2014 पर्यंत ते कॉंग्रेससोबत सत्तेत होते. 2014 मध्ये जरी ते सतेतून बाहेर गेले तरीही पूर्ण बहुमत न मिळालेली भाजपा ‘राष्ट्रवादी’ने मदत केल्यामुळेच शिवसेना येण्याअगोदर सत्तेत राहू शकली. आणि 2019 मध्ये जे अभूतपूर्व सत्तानाट्य महाराष्ट्रात घडलं, त्यानंतर ‘महाविकास आघाडी’ घडवून शिवसेना आणि कॉंग्रेससारख्या दोन ध्रुवांना एकत्र बांधणारी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’च होती.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द का झाला?

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने दोनच राज्यातून जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्राव्यतिरिक्त राष्ट्रवादीचा लक्षद्वीप मधून खासदार 2019 साली निवडून गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंड विधानसभेत एक आमदार आहे, केरळ विधानसभेत 2 आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या नागालॅंडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4 आमदार आले आहेत. नागालँडमध्ये 4 विधानसभेच्या जागा मिळाल्या असल्या तरी 4 राज्यांमध्ये किमान 6 टक्के मतं मिळालेली असण्याचा निकष पूर्ण झाला नाही, यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा आणि केव्हा मिळतो?

  • लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.
  • लोकसभेत 4 खासदार असावेत.
  • 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.
  • किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असावा.
  • या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.


हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कायदेशीर पावलं उचलणार – सुनील तटकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -