घरमहाराष्ट्रकुत्र्याने गृहपाठ खाल्ला...तो हरवला आहे

कुत्र्याने गृहपाठ खाल्ला…तो हरवला आहे

Subscribe

तब्बल ४९ टक्के विद्यार्थी गृहपाठ करणे टाळतात

गृहपाठ करणे ही विद्यार्थी दशेतील सर्वात आव्हानात्मक गोष्ट. अनेकवेळा गृहपाठ न झाल्याने शाळेत नेमकी कोणती कारणे सांगयाची यासाठी विविध कृप्त्या लढविणारे विद्यार्थी आजही भारतात कमी नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतातील एकूण ४९ टक्के विद्यार्थी गृहपाठ करण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी गृहपाठ न करण्यासाठी देत असलेली कारणे देखील मजेशीर आहेत. गृहपाठ कुत्र्याने खाल्ल्याचे विचित्र कारण काही विद्यार्थी देतात. पुन्हा हे कारण एकादाच विद्यार्थी देतो असे नाही, तर तब्बल ४ टक्के विद्यार्थी हे कारण देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांचे गृहपाठाबाबत पीयर-टू-पीयर लर्निंग कम्युनिटीने काही दिवसांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यासाठी २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांशी चर्चा केली. गृहपाठ केला नाहीतर विद्यार्थी काय कारण देतात हे त्यातून जाणण्यात आले. विशेष म्हणजे सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९.८% धाडसी विद्यार्थ्यांचा गट म्हणाला की त्यांनी गृहपाठ न केल्याची कधीच कारणे दिली नाहीत, तर जवळपास ३०% विद्यार्थ्यांनी ते वारंवार सबबी सांगत असल्याचे मान्य केले असून या सर्वेक्षणात ४९% विद्यार्थ्यांनी गृहपाठ करण्यात आपण कधीना कधी टाळाटाळ करीत असल्याचे कबूल केले आह

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी गृहपाठ न करण्याची विविध कारणे दिली आहेत. त्यात, कुत्र्याने गृहपाठ खाल्ला हे विशेष कारण आहे. हे कारण देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय असून ४ टक्के विद्यार्थी शाळेत हे कारण देत असल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्वाधिक १८.७% विद्यार्थी हे गृहपाठ हरविल्याचे कारण देतात. या व्यतिरिक्त ‘वैयक्तिक इजा’ झाल्याचे कारण १४.६% विद्यार्थी देतात. ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून गृहपाठ पळवला’(१३.१%), ‘त्याच्यावर शाई सांडली’ (८.२%) अशी काही मजेशीर करणे देखील देतात. तर ‘डोकेदुखी’ असल्याने अभ्यास करु शकलो नाही, असे एकूण १४.१% विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

तर ९.८ टक्के विद्यार्थ्यांनी ‘सांगता न येण्याजोगे कुटुंबात उद्भवलेले संकट’ असे कारण दिले आहे. तर ‘वैयक्तिक इजा’ झाल्याने गृहपाठ न दिल्याचे कारण १४.६% टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘लॅपटॉप क्रॅश झाला’(६.१%), ‘दुसर्‍या क्लासच्या वहीत गृहपाठ आहे’(४.४%),‘माझ्या हातातून वार्‍याने उडून गेला’(४%),‘आगीत जळून गेले’(३.४%)’ आदी मजेशीर कारणांचा देखील समावेश होता. या सर्व मजेशीर प्रतिसादांमध्ये ७०% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटते की जर त्यांना पुरेशी ऑनलाइन मदत मिळाली तर ते त्यांचा गृहपाठ वेळेत पूर्ण करतील. त्यामुळे नजिकच्या काळात विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी इंटरनेटला एक संसाधनात्मक स्थान बनविण्याची तीव्र आवश्यकता असल्याचे सूचित होते.

- Advertisement -

अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना गृहपाठाची नेहमीच भीती वाटत राहिली आहे. आम्ही या सर्वेक्षणाद्वारे काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वीकृती आणि कौतुक झाल्यावर गृहपाठ करण्यासाठी सहयोगी वृत्ती दिसून येते.
– मिशल बार्कोस्की, सहसंस्थापक, ब्रेनली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -