Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र आशादायी खुशखबर! गुरुवारपासून नाशिकसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

आशादायी खुशखबर! गुरुवारपासून नाशिकसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

Subscribe

नाशिक : पावसाने पाठ फिरवल्याने जिल्हयात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतांना आता शेतकरयांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हयात गुरूवार (दि. ७) पासून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्हयात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हयातील ९२ परिमंडळ पैकी ५५ मंडळांमध्ये २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. गतवर्षी सुमारे १२९ टक्के पर्जन्यमान झाले त्या तुलनेत यंदा केवळ ५१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. धरणांमध्येही उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र आता उशिरा का होईना पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागर वर थोडं उशिरा का होईना पन आज पहाटेला कमी दाब निर्माण झाला. यामुळे पुढील 4-5 दिवस परत एकदा चांगला पाऊस बघायला मिळेल, या कमी दाबामुळे पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हवामान अंदाजानुसार राज्यात बर्‍याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. पण हा पाऊस सार्वत्रिक नव्हता. आता शेतकर्‍यांना सर्वत्र आणि जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता अपेक्षित पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि. ७) राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. गुरुवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, नाशिक, नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. येत्या दिवसात चांगला पाऊस राहील आणि बळीराजा सुखावेल असे चित्र दिसतं आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -