घरताज्या घडामोडीनवाझ शरीफांना भेटायला नव्हतो गेलो, मोदींसोबतच्या व्यक्तिगत भेटीवर मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठ विधान

नवाझ शरीफांना भेटायला नव्हतो गेलो, मोदींसोबतच्या व्यक्तिगत भेटीवर मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठ विधान

Subscribe

आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही आहोत याचा अर्थ असा नाही की आमचं नातं तुटलेलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह इतर प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील राजकीय विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३० मिनीट पंतप्रधान मोदी यांच्याशी वैयक्तिक भेट घेतली आहे. या वैयक्तिक भेटीवर मी नवाझ शरिफ यांना भेटायला नव्हतो गेलो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतल्याने राज्यातील चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, चक्रीवादळाच्या समस्यांवर तोडगा, जीएसटी अशा अनेक विषयांसह ११ प्रमुख विषयांवर चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या वैयक्तित भेटीतील चर्चेविषयी बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटले आहे की, आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही आहोत याचा अर्थ असा नाही की आमचं नातं तुटलेलं आहे. मी नवाझ शरीफ यांना भेटायला नव्हतो गेलो तर पंतप्रधानांना भेटण्यासाठी गेलो यामध्ये काहीही चूक नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागील महिन्यात पंतप्रधान मोदींना मराठा आरणक्षणाच्या बाबतीत पत्र लिहिले होते. राज्यातील मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून घोषित करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर निर्णय देताना राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तयार केलेला कायदा रद्द करण्यात आला होता. यामुळे ५० टक्क्यांवरील आरक्षणाला धक्का लागला होता. यानंतर ३१ मे रोजी राज्य सरकारने ईडब्ल्यूएसचे लाभ मराठा समाजाला १० टक्के दिले होते.

व्यक्तिगत भेटीचा राज्याला फायदाच – फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असेल तर या भेटीचं स्वागत आहे. मोदी आणि ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट झाली की नाही याबाबत काही माहिती नाही. परंतु ही भेट झाली असेल तर या भेटीचा राज्याला फायदाच होणार आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -