घरताज्या घडामोडीराज्याच्या राजकारणात काय चाललंय याची कल्पना नाही, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणात काय चाललंय याची कल्पना नाही, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Subscribe

या मोठ्या राजकीय पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष असूनही मला काहीही माहित नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील अस्थिर राजकारणाविषयी आपल्याला काहीही माहित नसल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणात देशातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा हात असल्याचं म्हटलं जातंय, पण या मोठ्या राजकीय पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष असूनही मला काहीही माहित नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (I have no idea what is going on in the politics of the state, said Chandrakant Patil)

शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत आहेत. ३७ हून अधिक आमदार एकत्र असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे राज्यातील सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे. अनेक आमदारांवर कारवाई सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व घटनेमागे भाजपची भूमिका असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. ते निमयित दिल्लीला जात असतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या दिल्लीच्या अपॉइंटमेंट आत्ताच वाढल्या नाहीत, असंही पाटील म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -