विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खासगी शाळांमध्ये महापालिका राबवणार लसीकरण मोहीम

वाढत्या कोरोनाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी लसीकरणात (Corona Vaccination) वाढ करण्यात आली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जातो. याच पार्श्वभूमीवर आता महापालिका खासगी शाळांमध्ये (Private School) लसीकरणाच्या मोहिमेसा सुरूवात करणार आहे.

School Student Vaccination

वाढत्या कोरोनाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी लसीकरणात (Corona Vaccination) वाढ करण्यात आली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जातो. याच पार्श्वभूमीवर आता महापालिका खासगी शाळांमध्ये (Private School) लसीकरणाच्या मोहिमेसा सुरूवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्यभरातील १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली. मात्र याला अल्प प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत या वयोगटातील फक्त २३ टक्के डोस देण्यात आल्याचे समजते. (BMC Corona vaccination in private school for student safety)

मुंबईत (Mumbai) १२ ते १४ वयोगटातील जवळपास ४ लाख मुले आहेत. या मुलांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संकटापासून यांना संरक्षण देण्यासाठी यांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. तसेच, ही लसीकरण मोहिम अधिक फास्ट करण्यासाठी आता महापालिका (BMC) आता खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबवणार आहे.

हेही वाचा – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. या कालावधीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. विशेषता अनेक लहान मुलेही या कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळाही बंद ठेवण्यात आल्या होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या (School Students) सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे लसीकरण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आता खासगी शाळांमध्ये लसीकरण करणार आहे.

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणाला गती दिली जात आहे. तसेच, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठीही सरकारकडून विविध उपक्रम राबवली जात आहेत. त्याशिवाय आता ज्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना बुस्टर डोस दिले जात आहेत.


हेही वाचा – राज्यभरात बीए ४-५ प्रकारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ