घरताज्या घडामोडीमी ‘भाई’ युनिर्व्हसिटीत कधी गेलो नाही

मी ‘भाई’ युनिर्व्हसिटीत कधी गेलो नाही

Subscribe

पालकमंत्री भुजबळांचा कांदेंना टोला : तक्रारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शैलीत समाचार घेत मी कधी ‘भाई’ युनिर्व्हसिटीत गेलो नाही. मात्र उगाचच भुजबळांवर आरोप करून प्रसिध्दी मिळविण्याचा काहींचा प्रयत्न दिसून येतो. अशा प्रकारे खोटे आरोप करणार्‍यांबाबत गांभीर्याने विचार करावा याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सांगितले.

नांदगाव मतदासंघातील जिल्हा नियोजन विकास समितीमधील विकासनिधी वाटपावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात झालेला वादाचा मुद्दा अंडरवर्ल्डपर्यंत पोहचला आहे. पालकमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात आपण दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीने धमकी मिळाल्याची तक्रार कांदे यांनी पोलिसांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. छोटा राजनचा पुतण्या अभय निकाळजे याने फोनवरून धमकी दिल्याने या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. यासंदर्भात पुरपाहणी दरम्यान नाशिक दौर्‍यावर असलेल्या भुजबळ यांना विचारले असता त्यांनी कांदेंना खरमरीत उत्तर दिले आहे. भुजबळांचे नाव घेतले की, प्रसिध्दी मिळते याकरीता काही लोक असा उद्योग करत असावेत. आमदार कांदे यांनी जे आरोप माझ्यावर लावले आहेत त्याबाबत चौकशीची मागणी मी स्वतः केली आहे. उगाचच खोटे आरोप लावून भुजबळांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. ज्या धमकीबाबत कांदेंनी तक्रार केली आहे तो प्रकार घोटी टोलनाक्यावर कांदेे समर्थकांनी एका दांम्प्त्याच्या मारहाण प्रकरणाशी संबधित आहे याचा माझ्याशी कोणताही संबध नाही. मी कधी ‘भाई’ युनिर्व्हसिटीत गेलो नाही. उगाचच माझ्यावर आरोप केले जात आहेत. याची चौकशी तर व्हावीच शिवाय खोटे आरोप करणार्‍यांबाबतही गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळ यांनी आज जिल्हयातील पुर परिस्थितीची पाहणी करत आढावा घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -