घरताज्या घडामोडीअयोध्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशी असावी - संभाजी भिडे

अयोध्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशी असावी – संभाजी भिडे

Subscribe

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची जय्यत तयार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येतल्या राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याचं पार्श्वभूमीवर शिवप्रिष्ठात हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीला मिशी असावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

नक्की काय म्हणाले संभाजी भिडे?

प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवत आहे. पण आतापर्यंत राम, लक्ष्मण यांचं चित्र काढताना, मूर्ती साकारता शिल्पकार आणि चित्रकारांनी चूक केली की काय असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे अयोध्येत उभारल्या जाण्याऱ्या राम मंदिराच्या मूर्तीला मिशी असावी. आतापर्यंत झालेली चूक दुरुस्त करणार नसलो तर मंदिर होऊनही न झाल्यासारखंच आहे, असं भिडे म्हणाले.

- Advertisement -

भूमिपूजनदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात आहे. यामुळेच भूमिजनाला आपण त्यांची आठवण ठेवू. शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की, असं कवीभूषण यांनी म्हटलं होतं. त्यामुळेचे राम मंदिराच्या भूमिपूजनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं, असं संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान कोरोनाचं संकट लक्षात घेऊन राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत मांडलं होत. तर शरद पवारांनी राम मंदिरामुळे कोरोनाचं संकट दूर होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला होता. या विधानांवर देखील संभाजी भिडे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्ही नेते सन्माननीय आहेत. पण ते सध्या गोंधळलेले आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ व्यक्तीला मिळाले अयोद्धेतील रामजन्मभूमी पूजेचे पहिले आमंत्रण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -