घरताज्या घडामोडीकोकणात जायला बंदी घातली तर आंदोलन करू – नारायण राणे

कोकणात जायला बंदी घातली तर आंदोलन करू – नारायण राणे

Subscribe

सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानंतर आता यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी जर कोकणात जायला बंदी घातली तर आंदोलन करु असा इशाराच सरकारला दिला आहे. कोकणात जायला कुणीच बंदी घालू शकत नाही असे नारायण राणे यावेळी म्हणालेत. तसेच कोकणात जाण्यास पास सक्तीचा नको असे देखील राणे यावेळी म्हणालेत.

कोकणात जायला कोकणी माणसाला बंदी असे होऊ शकत नाही. असा आदेश निघालेला नाही. जर बंदीचा आदेश आला तर तीव्र आंदोलन करु, अशा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत यावर देखील टीका केली आहे.  एक शरद शिवसेना गारद असे म्हणत शिवसेनेवर टीका केली.  कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल असे देखील नारायण राणे यावेळी म्हणाले.


हे ही वाचा – चीनचे भारताला फुकटचे सल्ले, म्हणे ‘अमेरिका तुम्हाला भडकवतेय’!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -