इगतपुरी रेव्ह पार्टी : वाढदिवसाची पार्टी पडली महागात; बिग बॉस फेम हिना पांचालसह २२ जण ताब्यात

इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी (दि.२७)मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सिनेसृष्टीतील कलाकारांना अटक केल्याने पुन्हा सिनेसृष्टी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पोलिसांनी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या हिना पांचाल हिच्यासह एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना बिभत्स अवस्थेत ताब्यात घेतले. पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, कोकेन ड्रग्ज, हुक्कासह अमली पदार्थ व रोकड जप्त केली.

अशी आहेत ताब्यात घेतलेल्यांची नावे

संशयित पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफणा, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशिकी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पार्टीसाठी शुक्रवारीच लावली हजेरी

ऑनलाईन कपडे विक्रीचा व्यवसाय चार वर्षांपासून निरज ऊर्फ अरव ललित शर्मा व सुराणा यांची ओळख आहे. पियुष शहाच्या वाढदिवासाची पार्टी देण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) सकाळी विभा दिनेशभाई गोंडलिया या अरव, रुचिरा नार्वेकर आणि आकीब खान यांच्यासमवेत इगतपुरीतील स्काय ताज व्हीलामध्ये थांबले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री १२ वाजता पियुषचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. दुसर्‍या दिवशी शनिवारी रात्री ८ वएनंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. तरुण व तरुणी मद्यधुंद व नशेत नाचगाणी, धिंगाणा करत हुक्का, चरस, गांजा व ड्रग्जची पावडरसह मादक पदार्थांचे सेवन करत होते. मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी छापा टाकला.

रेव्ह पार्टीमुळे मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येणार आहे. पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आणण्यात आले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधून पोलिसांनी नायजेरियन नागरिकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यास इगतपुरीत आणले आहे.
सचिन पाटील, पोलीस अधीक्षक