घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समितीच्या माजी उपसभापतीच्या 'गोरख'धंद्याचा पर्दाफाश

बाजार समितीच्या माजी उपसभापतीच्या ‘गोरख’धंद्याचा पर्दाफाश

Subscribe

छ. संभाजीनगर : वैजापूर शहरातील भर बाजारपेठेत व पोलिस ठाण्याच्या पाठिमागे अगदी हाकेच्या अंतरावर लॉजच्या नावाखाली खुलेआमपणे चालणार्‍या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी सोमवारी (दि.11) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका पीडितेची सुटका करून लॉजमालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी उपसभापती व व्यवस्थापक हे ’धंदे’ करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बिनबोभाटपणे सुरू असलेल्या या ’वेश्यालया’ची भणक पोलिसांना लागू नये? पोलिस यंत्रणा याबाबत अनभिज्ञ कशी याबाबत चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

लॉजचालक विष्णू जेजूरकर (73 रा. महाराणा प्रताप रस्ता वैजापूर ) व व्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे ( 43 रा. बेलगाव ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महाराणा प्रताप रस्त्यावर नागरी वसाहत व भर बाजारपेठ असलेल्या विष्णू जेजूरकरच्या मालकीच्या लक्ष्मी लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अगोदर बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव, धुरंधरे, गाधेकर, पठाण यांच्या पथकाने सोमवारी (दि.11) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास लक्ष्मी लॉजवर ( पहिला मजला ) छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी लॉजमधून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 36 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एका पीडितेची सुटका केली. याशिवाय लॉजचालक विष्णू जेजूरकर व व्यवस्थापकास ताब्यात घेतलेे. याप्रकरणी दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी होऊन विष्णू जेजूरकर यांची उपसभापतीपदी निवड झाली होती. राजकीय पक्षात राहून असले ’धंदे’ करणार्‍यांचा बुरखा या कारवामुळे मात्र फाटला गेला. पोलिसांनी माजी उपसभापतीच्या ’धंद्या’चा पर्दाफाश केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पोलिसही होते वास्तव्यास

दरम्यान, लक्ष्मी लॉजवर गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यवसाय सुरू होता. विशेष म्हणजे वैजापूर पोलिस ठाण्याचे काही अधिकारी येथे वास्तव्यास होते. याचाच अर्थ पोलिसांच्या ’पहा-याखाली’ हे सर्व सुरू होते की काय? असेही म्हणण्यास नक्कीच वाव आहे. त्यांना जर हे माहिती होते तर त्यांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -