Ed चा मोर्चा आता अवैध खाणींकडे; 5 राज्यातील 18 ठिकाणावर छापेमारी

illegal mining case ed conducting searches at 18 locations in five state
Ed चा मोर्चा आता अवैध खाणींकडे; 5 राज्यातील 18 ठिकाणावर छापेमारी

अवैध खाण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. ईडीने झारखंड, राजस्थान, हरिणायासह पाच राज्यांमध्ये 18 ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. सध्य ईडीने झारखंडसह कोणत्या राज्यात कोणत्या ठिकाणी ही छापेमारी केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ईडीचे पथक आज सकाळी झारखंड, राजस्थान, हरियाणा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले असून छापेमारी सुरु केली आहे.

IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्या रांची येथील घरी छापेमारी

दरम्यान झारखंडची राजधानी रांची येथील आयएसएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. याशिवाय व्यावसायिक अमित अग्रवाल यांच्याही अनेक ठिकांणांवर छापे टाकण्यात आले. ईडीचे हे पथक दिल्लीहून आल्याची माहिती आहे. दरम्यान ईडीने पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौक, हरिओम टॉवर, नवीन बिल्डिंग, लालपूर, पल्स हॉस्पिटल, बरियाटू, आयएस पूजा सिंघल यांच्या सरकारी निवास स्थानावर छापे टाकले.

दुसरीकडे, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ईडीच्या छापेमारीवरून झारखंड सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार दुबे यांनी ट्विट केले की, झारखंड सरकार म्हणजे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि झारखंडच्या अधिकारी पूजा सिंघल, ज्यांनी सीएम हेमंत सोरेन, त्यांचे भाऊ बसंत सोरेन, कार्यकर्ते आणि दलाल यांना पैसे वाटप केले, शेवटी ईडीने त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. 20 ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. झारखंडमधील रांची, दिल्ली, राजस्थान आणि मुंबईतही छापेमारी सुरु असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी राम शंकर यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान आज सुरु असलेले छापेमारी आएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित आहे. दरम्यान ईडीने आज झारखंडमधील खाण आणि भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल आणि व्यावसायिक अमित अग्रवाल यांच्या रांची येथील जागेवर हा छापा टाकण्यात आला आहे.


Monsoon News : दिलासाजनक! यंदा मान्सूनचे 10 दिवस आधीच आगमन: मुंबई, कोकणात कधी होणार सुरूवात?