घरताज्या घडामोडीयेत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! - IMD

येत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! – IMD

Subscribe

मुंबईला विकेंडला पावसाने पुरते झोडपून काढले असतानाच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देणय्ता आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे. तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांसाठी १९ जुलै साठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर २० जुलैपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

पावसाचा रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी ?

येत्या २४ तासांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आङे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच काही भागात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहतील अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई तसेच परिसरासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठीही १८ जुलैचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट कोणत्या कालावधीसाठी ?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २० जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर तसेच साताऱ्यांसाठीही १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईत १८ जुलैला नेमका कुठे किती पाऊस झाला ?

मुंबईत १८ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत होतानाच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत २५ हून अधिक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. पण या रात्री अवघ्या ५ ते ६ तासांच्या कालावधीत अतिवृष्टीने मुंबईत अनेक भागात पाणी साचले. सांताक्रुझ वेधनशाळेत २३४ मिमी, कुलाबा १९६ मिमी, वांद्रे २०६ मिमी, जुहू २०६ मिमी, महालक्ष्मी १६४ मिमी, मिरा रोड २३५ मिमी, राम मंदिर १८८ मिमी, दहिसर २६८ मिमी, भायंदर २०३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -