चार दिवस पावसाचे, मुंबईला Orange तर कोकणात RED Alert ! – IMD

maharashtra rain alert heavy rain forecast for the next three days in state yellow alert issued marathwada

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने राज्यातील हवामानाचा आगामी पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामध्ये कोकण, गोव्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता येत्या दिवसांमध्ये वर्तवण्यात आली आहे. कोकणात पावसाचा जोर वाढले असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर मुंबईतही येत्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मुंबईला येत्या दिवसांसाठीही ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्याच्या १६ जुलै ते ३० जुलै या कालावधीसाठी हा हवामान विभागाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आगामी चार दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठवाड्यात आगामी पाच दिवसांमध्ये पहिले दोन दिवस पावसाचा जोर कायम असेल. पण त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही पहिल्या तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर उर्वरीत दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकणात तसेच गोव्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. त्यामध्ये कोकणात सुरूवातीच्या तीन दिवसांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात पहिल्या एक ते दोन दिवसात मुसळधार पाऊस असेल. तर उर्वरीत दिवसांमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज आहे.

मुंबईला Orange Alert !

मुंबई शहरासाठी विकेंडला शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत तीन दिवसांमध्ये Orange Alert जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये मुंबईत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. मुंबईसारखाच अतिवृष्टीचा इशारा हा कोकण आणि गोवा या भागासाठीही देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुरूवातीच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर असणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पण हा रेड अलर्ट फक्त १६ जुलैसाठी मर्यादित आहे.