घरताज्या घडामोडीमुंबईत 150 तळीरामांची झिंग पोलिसांनी उतरवली तर ८,६७८ जणांवर दंडात्मक कारवाई

मुंबईत 150 तळीरामांची झिंग पोलिसांनी उतरवली तर ८,६७८ जणांवर दंडात्मक कारवाई

Subscribe

मुंबई – थर्टी फर्स्ट साजरी करताना मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही मुंबईकरांनी या नियमांचे उल्लघंन केल्याचे दिसून आले. मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या १५६ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, तर रात्री उशिरापर्यंत ८ हजार ६७८ जणांवर विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे 31 डिसेंबरच्या रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. थर्टी फर्स्ट साजरा करताना मुंबईकरांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. इतकेच नव्हे तर बार, पब, हॉटेल मालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र उत्साहाच्या नादात अनेकांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे.

३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात अशा घटना घडून अपघात होत असल्याने संपूर्ण शहरात जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. ३१ डिसेंबरला दुपारपासून वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरू होती. यावेळी पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या १५६ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली. बंदोस्तासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांपासून पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह गस्त घालताना दिसत होते.

- Advertisement -

वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येत होते. कायदा व सुव्यवस्थेला बाधा होणार नाही याची सर्व खबरदारी पोलिसांकडून घेतली गेली होती. काही ठिकाणी मुंबईकर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना तसेच त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसून आले.

अशा प्रकारे केली कारवाई

- Advertisement -

ओव्हर स्पिडिंग, रॅश डायव्हिंग- ६६
विना हेल्मेट बाईक चालविणे- २,४६५
बाईकवर ट्रिपल सीट बसणे – २७४
वाहन चालवताना सिग्नल तोडणे- ६७९
नो इंट्रीमध्ये प्रवेश करणे- ६३५
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे- २३८
नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे आदी कलमांतर्गत ३,0 ८७
जणांवर तर ३६२ वाहन टोईंग करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -