घरताज्या घडामोडीराजस्थानमध्ये सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल 11 डबे रुळावरून घसरले

राजस्थानमध्ये सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल 11 डबे रुळावरून घसरले

Subscribe

नवीन वर्षाचा दुसराच दिवस रेल्वे अपघाताचा ठरला आहे. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जानेवारी 2023 रोजी राजस्थानमधील पाली येथे वांद्रे-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा रेल्वे अपघात झाला

नवीन वर्षाचा दुसराच दिवस रेल्वे अपघाताचा ठरला आहे. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जानेवारी 2023 रोजी राजस्थानमधील पाली येथे वांद्रे-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा रेल्वे अपघात झाला असून, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. (suryanagari express train 11 coaches derailed between rajkiawas bomadra section of jodhpur division in pali rajasthan)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 3:27 वाजता बांद्रा-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे (Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express) 11 डब्बे रुळावरून घसरले. या अपघातानंतर राजस्थानमधील जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शनवर (Rajkiawas-Bomadra section) रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

- Advertisement -

वांद्रे-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच तातडीने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, या दुर्घटनेत जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे पोलीस आणि कर्मचारी, अधिकारी रेल्वे गाडी रुळावरून बाजूला काढण्याचे काम शर्तीच्या प्रयत्नांवर करत आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. शिवाय प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

- Advertisement -

रेल्वेची हेल्पलाईन

जोधपूर

  • 0291- 2654979(1072)
  • 0291- 2654993(1072)
  • 0291- 2624125
  • 0291- 2431646

पाली मारवाड

  • 0293- 2250324

दरम्यान, रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ प्रवाशांची सुटका केली. तसेच ही संपूर्ण रेल्वे खाली करण्यात येत आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून तोपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला आहे. तसेच रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला आहे. तसेच सध्या चार एक्सप्रेसचे मार्गही बदलण्यात आले आहेत. या शिवाय प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.


हेही वाचा – दिग्गजांचा जामीन आणि तपास यंत्रणांचे आत्मपरीक्षण!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -