घरमहाराष्ट्रनिवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक प्रतिज्ञा पत्रासंदर्भात आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे. शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. देशात एवढे सदस्य आहेत, त्यांच्यापैकी आम्हालाच नोटीस आली यावरुन आमच्याबद्दल प्रेमाची भावना दिसत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

“आधी नोटीस मला आली, आता सुप्रियाला येणार असल्याचं कळालं आहे. चांगली गोष्टी आहे. संपूर्ण देशात एवढे सदस्य आहेत, मात्र आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून स्पष्टीकरण मागवलं आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन,” असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार यांनी यावेळी राज्यसभा उपसभापतींवर तसंच कृषी विधेयकं संमत करण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होणे अपेक्षित असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता. सदनाची कामं रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं, अशी टीका शरद पवार यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -