घरमहाराष्ट्रयशवंत जाधव यांच्या घरी आयटीचे छापे

यशवंत जाधव यांच्या घरी आयटीचे छापे

Subscribe

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेला मोठा धक्का

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकून चौकशी केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्राप्तिकर विभागाने केलेली कारवाई म्हणजे, शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. याआधीही यशवंत जाधव प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले होते. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आणि जाधव कुटुंबियांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार करून पैसे कमावल्याचा दावा प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या याआधीच्या तपासात ही माहिती उघड झाल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

यामिनी जाधव यांनी प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मात्र, तपासात प्रधान डिलर्स ही एक शेल कंपनी असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत पुढे आले होते. यामिनी जाधव यांनी 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत असल्या तरी हा पैसा त्यांचा स्वत:चाच होता, असा प्राप्तिकर विभागाचा दावा आहे. महावर यांनी सन 2011-12 मध्ये प्रधान डिलर्स कंपनीची स्थापना केल्याचे महावर यांनी चौकशीत सांगितले होते. यात पैसा कमावल्यानंतर कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली होती.

2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. यात 2.74 कोटींची जंगम मालमत्ता होती. तर आपले पती यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. यामध्ये 1.72 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.

- Advertisement -

यशवंत जाधव यांच्यानंतर मलबार हिल परिसरात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेचे कंत्राटदार बिपीन मदानी यांच्या घरावर देखील प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. बिपीन मदानी घरात नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. 4 तासांपेक्षा जास्त वेळ ही चौकशी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -