घरताज्या घडामोडी११ हजार भारतीयांमागे एक डॉक्टर, करोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण

११ हजार भारतीयांमागे एक डॉक्टर, करोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण

Subscribe

देशात १८२६ भारतीयांमागे एक हॉस्पिटल बेड, ३६ हजार जणांमागे एक क्वारंटाईन बेड, ८४ हजार जणांमागे एक आयसोलेशन बेड

आरोग्य मंत्राय़लायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात ८४ हजार जणांमागे एक आयसोलेशन (विलगीकरण)साठीचा बेड आहे. ३६ हजार भारतीयांमागे एक अलगीकरण (क्वारंटाईन) बेड आहे. तर ११ हजार ६०० भारतीयांमागे एक डॉक्टर अशी स्थिती आहे. जवळपास १८२६ भारतीयांमागे एक हॉस्पिटल बेड आहे असा डेटा आरोग्य मंत्रायलामार्फत जाहीर करण्यात आला आहे. म्हणूनच सोशल डिस्टन्सिंगसाठी आरोग्य मंत्रालयाचा डेटा महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या सोयीसुविधांनुसार आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा या मर्यादित म्हणूनच आहेत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या डॉक्टरांच्या मते आता आपण करोनाच्या बाबतीत दुसऱ्या टप्प्यात आहोत. म्हणूनच सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे. स्टेज ३ मध्ये लॉकडाऊन अपेक्षित असते. म्हणूनच सोशल डिस्टसिंगमुळे ही करोनाची लाट काहीश्या प्रमाणात नियंत्रित होण्यासाठी मदतीची होईल. सध्याच्या करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी सोशल डिस्टसिंग ही एक चांगली पद्धत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला शासकीय पातळीवर योग्य त्या उपाययोजना होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशाच्या नॅशनल हेल्थ प्रोफाईल २०१९ नुसार देशात ११ लाख ५४ हजार ६८६ एलोपॅथी डॉक्टर्स आहेत. तर देशात शासकीय हॉस्पिटल्समध्ये असणाऱ्या बेड्सची संख्या ही ७ लाख ३९ हजार २४ इतकी आहे. देशात सामान्य परिस्थितीतच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतो. पण खाजगी क्षेत्राचा समावेश कोव्हिड १९ च्या मॅनेजमेंट प्लॅनसाठी करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीला देशात फक्त शासकीय रूग्णालयातच सध्या बेड्सची व्यवस्था आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -