घरदेश-विदेशतरुणांनी करायचं काय? बेरोजगारीचा 16 महिन्यांतील उच्चांक, 'या' दहा राज्यांत नोकऱ्यांची वानवा

तरुणांनी करायचं काय? बेरोजगारीचा 16 महिन्यांतील उच्चांक, ‘या’ दहा राज्यांत नोकऱ्यांची वानवा

Subscribe

कोरोना महामारी आणि आर्थिक मंदीमुळे भारतासह जगभरात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. विशेषत: आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय. यात भारतातही कोरोनानंतर अनेकांच्या हातचं काम गेलं. त्यामुळे भारतात अद्यापही अनेक सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत देशातील बेरोजगारीबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात बेरोजगारीने गेल्या 16 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. यात दहा राज्यांत तर नोकऱ्यांची वानवा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये देशात 8 टक्के असलेला बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3 टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) आकडेवारीतून समोर आली आहे.

यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारपुढे आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी वाढलेली महागाई आणि लाखो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणे मोठे आव्हान असणार आहे. सीएमआयईच्या जाहीर आकडेवारीनुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. शहरी भागात नोव्हेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 8.96 टक्के इतका होता, ज्यात डिसेंबर 2022 वाढ झाली असून तो 10.09 टक्क्यांवर गेला आहे. यात ग्रामीण भागातील बरोजगारीचा किंचित कमी झाल्याचा दिसतोय. नोव्हेंबर 2022 मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.55 टक्के इतका होता तो आता डिसेंबर 2022 मध्ये 7.44 टक्क्यांवर येऊन घसरला आहे. त्यामुळे शहरी भागातील बेरोजगारीचा दर सरासरी 10.1 टक्के आणि ग्रामीण भागांतील सरासरी दर 7.5 टक्के आहे. यात हरियाणा राज्यात सर्वाधिक बेरोजगारीचा दर (37.4 टक्के) आहे. तर सर्वात कमी बेरोजगारीचा दर ओडिशा राज्यात (0.9 टक्के) आहे. यात महाराष्ट्राचा विचार केल्यास, महाराष्ट्रात डिसेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 3.1 टक्के होता.

- Advertisement -

बेरोजगारीचा वाढ दर तितकासा वाईट नाही, कारण डिसेंबरमध्ये श्रमिक सहभाग दर सन 2022 मधील सर्वाधिक म्हणजे 40.48 टक्के इतका आहे. या सर्वात महत्वाचे म्हणजे डिसेंबरमध्ये रोजगार दर 37.1 टक्क्यांपर्यंत वाढत आहे. जो जानेवारी नंतरचा उच्चांक आहे, असे सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले.

देशातील रोजगार आणि बेरोजगार स्थिती शोधण्यासाठी सीएमआयईने स्वैरपणे सुमारे 32 हजार 166 कुटुंबांची निवड केली, यात 15 वर्षांवरील 1 लाख पाच हजार 25 हून अधिक व्यक्तींच्या थेट मुलाखती घेतल्या. यावरून देशातील रोजगार आणि बेरोजगारीच्या दराचा अंदाज लावण्यात आला, सध्या कोणतीही रोजगार करत नसलेला परंतु काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या संख्येवरून बेरोजगारीचा दर ठरवला जातो.

- Advertisement -

सर्वाधिक बेरोजगारी असलेली 10 राज्ये

हरयाणा : 37.4

राजस्थान : 28.5

दिल्ली : 20.8

बिहार : 19.1

झारखंड : 18.0

जम्मू-काश्मीर : 14.8

त्रिपुरा : 14.3


राज्यातील आरोग्यव्यवस्था कोलमडणार! आजपासून हजारो निवासी डॉक्टर संपावर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -