घरताज्या घडामोडीअखेर इंदोरीकर महाराजांनी दिले नोटिशीला उत्तर

अखेर इंदोरीकर महाराजांनी दिले नोटिशीला उत्तर

Subscribe

त्या वादग्रस्त वक्तव्यावर नोटीस मिळाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर पाठवले आहे.

पुत्रप्राप्ती संदर्भातील आपल्या विधानावरून गेल्या काही दिवसांपासून समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) चांगलेच वादात सापडले आहे. यासंदर्भात अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना नोटीस बजावल्यानंतर या नोटिशीला इंदुरीकर यांनी बुधवारी आपल्या वकिलांमार्फत उत्तर दिले आहे. मात्र यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

सम तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगा, विषम तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगी होते, अश्या आशयाचे विधान त्यांनी आपल्या कीर्तनात केले होते. या कीर्तनाचा व्हिडिओ यु ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. दैनिक आपलं महानगरने यासंबंधी सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यासंदर्भात इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती. तर इंदोरीकर समर्थकांनीदेखील या विरोधात मोहीम उघडली. राज्यभर यावरून वादंग निर्माण झाले होते. यानंतर नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनाच्या संदर्भात नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देऊन कायदेशीर लढाई लढणार असल्याचे इंदोरीकर यांनी सांगीतले होते.

- Advertisement -

हे वाचा – नक्की काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज

दरम्यान इंदोरीकर यांनी एका लेखी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर नगरमध्ये अनिस आणि तृप्ती देसाई यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर यांच्या त्याच्याकडे लक्ष लागले होते. आज इंदोरीकर महाराजांच्या वकिलांनी एका सेवकासोबत नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन त्यांच्या वक्तव्यावरील खुलासा सादर केला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाच्यावतीने बोलण्यास नकार दिला आहे. तर संबंधित वकिलांनी दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे देखील वाचा – Video: युट्यूबनं कितीही काड्या केल्या तरी मी संपणार नाही – इंदुरीकर महाराज

 

संभाजी भिडे यांच्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर यांनीही केले पुत्रप्राप्तीबद्दल धक्कादायक वक्तव्य… (Video Courtesy – मराठी किर्तन STUDIO)

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 3, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -